आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकेने व्याकूळ होऊन रडत होते मूल, पण दुधाची व्यवस्था करू न शकल्यामुळे जन्मदात्रीने पोटच्या मुलाची गळा आवळून केली हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नौज (उत्तर प्रदेश) - जिल्ह्यात आर्थिक परिस्थितीमुळे मुलासाठी दुधाची व्यवस्था करू न  शकल्यामुळे महिलेने आपल्याच पोटच्या चिमुकल्याची गळा आवळून हत्या केली. रुखसार असे महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या मते, छिबरामऊ येथे राहणारी महिलेचा पती कामानिमित्त मुंबईत राहतो. महिलेचे पतीसोबत भांडण झाले होते. यामुळे तिच्या पतीने 4-5 महिन्यांपासून घरी पैसे पाठवले नाहीत. अशा या परिस्थितीत रुखसार कसेबसे मुलांचे पोट भरत होती. 

 

मुलीने पोलिसांना दिले विधान
रुखसारचा आठ महिन्याचा मुलगा अहद तीन दिवसांपासून उपाशी होता. रुखसार त्याच्यासाठी दुधाची व्यवस्था करू शकली नाही. रात्रीपासून अहद दुधासाठी रडत होता. अखेर त्याच्या रडण्याचा वैतागून महिलेने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. दरम्यान . की सकाळी आईने रागाच्या भरात भावाचा गळा आवळून खून केल्याचे महिलेची अडीच वर्षीय मुलगी अनमने पोलिसांना सांगितले.