Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | mother killed her daughter in nashik

चोराने खून केल्याचा बनाव उघड, आईनेच केली चिमुकलीची हत्या; कारण अद्याप गुलदस्त्यातच, आईला अटक

प्रतिनिधी, | Update - Jul 18, 2019, 08:38 AM IST

घरात कुणी आलाच नाही, सीसीटीव्हीतून झाले स्पष्ट

  • mother killed her daughter in nashik

    नाशिक - चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या व्यक्तीने दीडवर्षीय मुलीची हत्या केल्याचा बनाव करणाऱ्या आईनेच तिची हत्या केल्याचा प्रकार नाशकात समोर आला आहे. पाेलिसंानी बुधवारी आई याेगिता मुकेश पवार हिला अटक केली. घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यावरून पाेलिसांनी ही अटक केली असली तरी हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.


    या घटनेबाबत सीसीटव्ही फुटेज व कुटुंबातील सदस्यांचे काॅल रेकाॅर्डिंग तपासले जात असल्याची माहिती पाेलिस अधिकाऱ्यंानी दिली. आैरंगाबादराेड परिसरातील साई पॅराडाईज या इमारतीमध्ये मंगळवारी दुपारी स्वरा मुकेश पवार हिचा गळा चिरून खून केल्याची घटना समाेर आली हाेती. वर्दळीच्या परिसरात भर दुपारी चिमुरडीचा खून केल्याने खळबळ उडाली हाेती. याबाबत बालिकेच्या आईने पाेलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दुपारी कचरा टाकण्यासाठी गेली असताना अज्ञात व्यक्ती घरात चाेरी करण्याच्या उद्देशाने शिरली आणि तिने माझ्यासह स्वरावर वार केले. त्या दृष्टीने पाेलिसांनी तपास केला असता प्रकारामागे घातपाताचा संशय पाेलिसांकडून व्यक्त करण्यात आला. पाेलिसांनी तपास करत घटनेच्या ठिकाणी असलेले पूरावे, परिसरात असलेले सीसीटिव्ही फुटेज, काॅल रेकाॅर्डिग आदी माहिती गाेळा केली. पाेलिसांच्या तपासात घरात कोणीही संशयित चाकू घेऊन शिरलेला नसल्याचीही बाब उघडकीस आली. त्यामुळेे आईनेच बनाव केल्याचे समाेर येताच पाेलिसांनी बुधवारी संशयावरुन त्या बालिकेच्या आईला अटक केली.


    घरात कुणी आलाच नाही, सीसीटीव्हीतून झाले स्पष्ट
    घटनास्थळांचा पाेलिस अधिकाऱ्यांसह श्वान पथक, वैज्ञानिक न्याय सहायक पथकाने शाेध घेतला असता घटनास्थळी निलकटर, ब्लेड पान या संशयास्पद वस्तू आढळून आल्या. शिवाय, आसपासच्या सीसीटीव्हीमध्येही घरात कुणी घुसल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांचा आईवरील संशय अधिळ बळावला.

Trending