आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरं अपत्य मुलगीच झाल्याने आईनेच घोटला चिमुकलीचा गळा; वृंदावन नगरात उघडकीस आला प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तिसरीही मुलगी झाल्याने जन्मदात्या आईनेचे पोटच्या गोळ्याचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार वृंदावननगरात उघडकीस आला. पियू असे या दुर्दैवी मुलीचे आहे. पोलिसांनी तिची आई अनुजा काळेविरोधात खूनचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे. तिचा पती बाबासाहेब काळे यांनीच पोलिसांत तक्रार दिली आहे.


तक्रारीनुसार, ३१ मे रोजी अनुजाच्या मावसभावाच्या लग्नासाठी बाबासाहेबशिंगवे कोपर गाव येथे गेले होते. घरी अनुजासह मुलगी आराध्या व पियू होते. लग्न आटोपल्यानंतर घरी परत येतांना रस्त्यात मोबाइलवर आराध्याचा फोन आला आणि पियू डोळे उघडत नसून आई रडतेय, असे तिने सांगितले. दरम्यान, बाबासाहेबांनी लागलीच शेजाऱ्यांना फोन करून तिला दवाखान्यात नेण्यास सांगितले. ते पोहोचताच मुलगी मृत झाल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदन अहवालात तिचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, संशयित अनुजाविरोधात आडगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  

 

शारीरीक दोष शोधताना झाला हत्येचा उलगडा
अनुजा व बाळासाहेब या दांपत्याची पहिली मुलगी ६ वर्षांची असून तिला टाइप-१ मधुमेह आहे. त्यामुळे तिला दिवसातून चारदा इन्सुलिन घ्यावे लागते. तर, दुसऱ्या मुलीचा जन्माच्या बारा दिवसांनंतर फिटच्या आजाराने निधन झाले. आता तिसरी मुलगीही मरण पावल्याने बाळासाहेब अस्वस्थ झाले. या घटनांमागे पती-पत्नीत काही शारीरिक दोष आहे का, या शंकेने त्यांनी पियूचे शवविच्छेदन करण्याची विनंती केली. मात्र, त्यात तिचा खून झाल्याचे समोर आले आणि संपूर्ण प्रकार समोर आला.