आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने केला आपल्याच जुळ्या मुलांचा खून, नंतर केले अपघाताचे नाटक...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅरगेट- इंग्लंडच्या कँटमध्ये एका आईच्या निर्दयपणाची गोष्ट समोर आली आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांना एका अपघाताची माहिती मिळते, त्यांना कळते की, वेगवान कारने मागून ट्रकला टक्कर मारली आहे. घटनास्थळावरून पोलिस कार चालवणाऱ्या महिलेला अटक करते. चौकशीत पोलिसांना तिच्यावर संशय येतो तेव्हा पोलिस तिच्या घराची झडती घेतात आणि त्यांना ते भयानक दृष्य दिसते.

 

- महिलेचा नाव समंथा फोर्ड आहे. पोलिसांना संशय येतो की, समंथा कोणता ड्रग डीलर किंवा एखादा अपघात करून पळाली आहे, त्यामुळे पोलिस तिच्या घराची झडती घेतात. जेव्हा पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना बेडरूममध्ये दोन मुले दिसली.

 

- रूममध्ये मुलांना त्या अवस्थेत पाहून पोलिसांना कळते की, काय झाले आहे. डॉक्टर त्या दोघांना वाचवण्याचा खुप प्रयत्न करतात पण शेवटी त्या दोघांचे निधन होते.


महिलेने का केला आपल्याच मुलांची खून...?

- या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. एका पोलिसांने सांगितले की, कसे ते एका अॅक्सीडेंट प्रकरणाची चौकशी करत होते आणि त्यांना डबल मर्डरचे प्रकरण समजले. पोलिस हैराण झाले की, एक महिला आपल्याच जुळ्या मुलांना कसे मारू शकते.

 

- पोलिसांना आतापर्यंत खूनामागचे कारण समजले नसले तरी, पोलिसांनी महिला आणि तिच्या नवऱ्याच्या सोशल मिडियो अकाउंटवरून काही माहिती मिळते का याचा तपास करत आहे. सध्या महिला पोलिसांच्या ताब्यात आहे.

 

- पोलिसांना खूनात वापरण्यात आलेली उशी मिळाली आहे ज्याने त्या दोन्ही मुलांचे तोंड दाबण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...