Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Mother killed her son in aurangabad

गल्लीत उभा राहून शिव्या देतो म्हणून आईने केला मुलाचा खून; मृतदेह रिक्षात टाकून फेकला

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 10:37 AM IST

गल्लीत उभा राहून कायम शिव्या देतो, काहीही बडबडतो म्हणून सख्ख्या आईनेच तरुण मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Mother killed her son in aurangabad

    औरंगाबाद- गल्लीत उभा राहून कायम शिव्या देतो, काहीही बडबडतो म्हणून सख्ख्या आईनेच तरुण मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच महिने तपास करून सिडको पोलिसांनी या खुनाचे रहस्य उलगडले. राहुल दिलीप बनसोडे (२८, रा. आंबेडकरनगर) असे मृताचे नाव आहे. राहुलची आई कमलाबाई दिलीप बनसोडे, खिरणाबाई जगन्नाथ गायकवाड, सुनीता राजू साळवे आणि रिक्षाचालक इंद्रजित हिरामण निकाळजे या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


    १८ एप्रिल रोजी साडेदहा वाजता जाधववाडी मोंढा येथे जुन्या पडक्या विहिरीत राहुलचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा चिरल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासादरम्यान एका रिक्षाने या ठिकाणी प्रेत आणून टाकल्याची माहिती समोर आली होती. तपासाअंती तो रिक्षाचालक पोलिसांना सापडला. याचदरम्यान त्याने केवळ १२ हजारांत रिक्षा विकल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांचा संशय अजून बळावला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व इतर लोकांची नावे सांगितली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलिस आयुक्त गुणाजी सावंत, डॉ. नागनाथ कोडे, निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक विश्वनाथ झुंझारे, भरत पाचोळे, नरसिंग पवार, राजेश बनकर, दिनेश बन, प्रकाश डोंगरे, संतोष मुदिराज, सुरेश भिसे, ईश्वर गाढे, स्वप्निल रत्नपारखी, कलम गदई यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Trending