आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनवर्षीय मुलाचा विळीने गळा चिरून आईचीही आत्महत्या, उस्‍मानाबादेतील धक्‍कादायक घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईट - भूम तालुक्यातील घाटनांदूर येथील ३० वर्षीय विवाहितेने आपल्या २ वर्षीय मुलाचा विळीने गळा चिरून त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.८) सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली.

 

घाटनांदूर येथील रामदास पवार हे वडील, पत्नी शुभांगी व २ वर्षांच्या कौस्तुभसह राहतात. शनिवारी सकाळी ते बैलपोळ्याच्या सणाची खरेदीसाठी ईट येथे गेले. घरी असलेल्या शुभांगी यांनी मुलगा कौस्तुभ याचा घरातील विळीने गळा चिरून हत्या करत त्याचा मृतदेह लोखंडी दिवाणवर रग टाकून झाकला. त्यानंतर स्वत:ही साडीने माळवदाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ५ वाजता रामदास व त्यांचे वडील घरी परतल्यानंतर घडला प्रकार समोर आला. या घटनेमागचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

 

बातम्या आणखी आहेत...