आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल अंबानीला पैसै देण्यासाठी आई कोकिळाबेनने मुकेश अंबानींना केले होते तयार, मोठ्या भावाने केलेल्या या कामाचे जो तो करतोय कौतुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  उद्योगपती मुकेश अंबानी यांनी लहान भाऊ अनिल अंबानीला तुरुंगाची हवा खाण्यापासून वाचवले. यानंतर भविष्यात दोघे भाऊ एकत्र येऊ शकतात याबाबत व्यापार विश्वात चर्चा सुरु आहे. लहान भावाची मदत करण्यासाठी आई कोकिळाबेन यांनी मोठ्या भावाला सांगितले असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आतील सुत्रांकडून समजते. मोठ्या भावाने केलेल्या मदतीमुळे प्रत्येकजण त्यांचे कौतुक करत आहे. अनिल अंबानींना 450 कोटींची मदत करणारे मुकेश अंबानी आपल्या परिवारासह 12 हजार कोटींच्या 'अँटीलिया'मध्ये राहतात. याअनुषंगानेच देशातील 6 प्रसिद्ध व्यावसायिकांचे घर आणि त्याच्या किंमतीविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 


 

हे आहे अँटीलियाचे वैशिष्ट्य

मुंबईच्या ऑफ पेडर रोडवरील 'अल्टामाउंट रोडवर' स्थित असलेला अँटीलिया हाऊस 27  मजली इमारत आहे. यामध्ये प्रायव्हेट मूव्ही थिअटर, स्वीमिंगपूल, हेलिपॅड, सारख्या सुविधा आहेत. या इमारतीमधून समुद्राचे देखील दर्शन होते. फोर्ब्सने काही दिवसांपूर्वी सर्वांत महागड्या घरांच्या यादीत अँटीलियाला स्थान दिले होते. फोर्ब्सच्या मते या घराची किंमत 2 बिलियन डॉलर (तब्बल 12 हजार कोटी रुपये) आहे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा..... इतर उद्योजकांच्या घरांच्या किंमती आणि वैशिष्ट्ये 

बातम्या आणखी आहेत...