आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई ती आईच! अंगावरून रेल्वे धावली, कटले दोन्ही पाय, तरीही बेशुद्ध अवस्थेत लेकराला शोधत होते हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - आई ती आईच असते. तिची तुलना कुणाशीच करता येत नाही. लाख दुख असतील पण आपल्या मुलाच्या एका स्मितहास्याने तिला सर्वच गोष्टींचा विसर पडतो. तिची सर्वात मोठी भीती एकच, की माझ्या मुलांना काही होऊ नये. असेच एक जिवंत उदाहरण झारखंडच्या मोदीनगर येथे सापडले आहे. येथे एक आई आपल्या 5 महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात एक भरधाव मालगाडी तिच्या अंगावरून धावली. तिचे दोन्ही पाय कापल्या गेले. यावेळी आईची माया पाहून सगळ्यांचे हृदय पिळवटले. 


पोटात असताना झाला वडिलांचा मृत्यू
सुचिता असे त्या महिलेचे नाव असून ती झारखंडच्या मोदीनगर परिसरात राहते. तिच्या पतीचे याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात निधन झाले. त्यावेळी हेच बाळ तिच्या पोटात होते. पती आपल्या बाळाचा चेहरा देखील पाहू शकला नाही. ती सोमवारी आपल्या बाळाला कुशीत घेऊन रेल्वे रुळ ओलांडत होती. त्याचवेळी एका भरधाव मालगाडीने तिला चिरलडले. तिचे दोन्ही पाय कापले गेले आणि तिला काहीच सूचत नव्हते. तरीही आपले बाळ कुठे आहे याचा शोध ती हात पसरवून घेत होती. 


आईची प्रकृती नाजूक
त्याच ठिकाणी असलेल्या गर्दीपैकी काहींनी ते बाळ सुखरूप असल्याचे पाहिले आणि त्या आईच्या शेजारी आणून ठेवले. दोन्ही पाय कापले तरीही तिला काही वेदना नव्हत्या. परंतु, बाळ सुखरूप असल्याचे पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. यानंतर स्थानिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. यासोबत बाळाला सुद्धा उपचारासाठी आयसीयूत ठेवण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...