आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून आई खून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- जिंतूर तालुक्यातील कुंभारी येथील राजू जगन्नाथ बोथे या आरोपीने शेतजमीन वाटणीच्या वादातून सावत्र आईचा तीक्ष्ण कोयत्याने खून केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी - फलके यांनी सुनावली आहे. 


कौसडी सर्कल हद्दीत असलेल्या कुंभारी या गावातील जगन्नाथ बोथे या तरुणाने शेतजमीन वाटणीचा वाद केला. या वादाचे पर्यवसान खुनात झाले. ९ डिसेंबर २०१५ रोजी त्याने सावत्र आईच्या अंगावर तीक्ष्ण कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून आरोपी मुलगा राजू जगन्नाथ बोथे याने बोरी पोलिस ठाणे गाठून घडलेली हकिकत सांगितली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक व्ही.के. झुंजारे यांना आरोपी बोथे याने मीच माझ्या सावत्र आईचा शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून खून केला आहे, अशी कबुली दिली. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक व्ही. के. झुंजारे यांनी आरोपीस तत्काळ अटक केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तरडे, बीट जमादार कदम, पो. हे. कॉ. सानप यांनी तपास केला. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या वेळी साक्षीदार, वैद्यकीय तपासणी अहवाल आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले. यात आरोपी जगन्नाथ बोथे यास जन्मठेपेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी- फलके यांनी सुनावली. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. दीपक गांजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील अॅड. नीलिमा कोकड यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...