आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या मातोश्रींनी घरात बसून अनुभवला शपथविधी सोहळा, मोदींनी शपथ घेताच वाजवल्या टाळ्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात झाली. हा शपथविधीचा सोहला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री आपल्या घरात बसून पाहत होत्या. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. 

 

शपथविधी कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी गोपनियतेची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्या मातोश्री आपल्या घरातील टीव्हीवर हा कार्यक्रम पाहत होत्या. मोदींनी शपथ घेतली तेव्हा त्यांच्या मातोश्री ताळ्या वाजवताना दिसल्या. मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात राजकारण, उद्योग, बॉलिवूड आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींसह परदेशातील नेत्यांनीही उपस्थिती लावली आहे.