आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईची माया: 3 महिन्यांच्या मुलीसोबत कारमधून जात होती आई, तेवढ्यात वादळाने गाठल्याने झाला घात, काच फुटून तुकडे शरीरात घुसले, पण आईने मानली नाही हार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क/ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियात एका आईने आपल्या जिवाची बाजी लावून मुलीचा जीव वाचवला. महिला ब्रिस्बेनच्या ग्रामीण भागात आपल्या फक्त 3 महिन्यांच्या तान्हुलीसह वादळात अडकली होती. महिलेने आपल्या मुलीला कुशीत घेतले, यामुळे बाळ वाचले, पण ती प्रचंड जखमी झाली. तिचे हे जखमांचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले.

 

काय झाले वादळात?
फियोना सिम्पसन नावाची ही महिला म्हणाली की, ती ब्रिस्बेनमध्ये आपल्या कारमधून मुलगी आणि तिच्या आजीसेाबत जात होती. तेवढ्यात वाटेत वादळाने त्यांचा रस्ता रोखला. वादळामुळे मोठमोठे दगड तिच्या कारवर येऊन आदळू लागले. यामुळे कारची काच फुटून लागली. फियोना कारचे काच आणि बाळामध्ये भिंत बनली. यामुळे टोकदार काच बाळापासून दूरच राहिले. तिने हे खूप वेळ सहन केले. 

 

रक्तबंबाळ झाली होती आईची पाठ
या पूर्ण घटनेदरम्यान तिच्या शरीरावर काचेचे एवढे तुकडे घुसले की ती रक्तबंबाळ झाली, परंतु तरीही ती तिथून हटली नाही. तिने आपल्या या जखमा फेसबुकवर शेअर केल्या आहेत. तिने या पोस्टसोबत लिहिले की, वादळात कधीही ड्राइव्हवर बाहेर पडू नका. काहीही घडू शकते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित व्हिडिओ आणि फोटोज... 

 

 

बातम्या आणखी आहेत...