आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mother Sent Son To Jail For Getting Rid Of Bad Conscience

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नको ते काम करत होता मुलगा, अनेकवेळा समजावूनही सुधारला नाही; अखेर आईने काळजावर दगड ठेवून केले हे कृत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भिलाई (छत्तीसगड) : एक आई आपल्या मुलांना वाचविण्यासाठी त्याच्या चुकांवर नेहमीच पांघरूण घालत असते. पण अनेकवेळा असेही पाहायला मिळते, की मुलगा सुधारावा यासाठी आई कठोर भूमिका घेते. असेच एक प्रकरण भिलाई येथील गुरू घासीदास नगरमध्ये पाहायला मिळाले. आपल्या मुलाने वाईट संगत सोडून चांगला माणून बनावे हीच त्यांची अपेक्षा आहे. यासाठी त्याने आईने आपला मुलगा सुधारावा यासाठी काळजावर दगड ठेवून त्याला तुरुंगात पाठविले आहे.


एक आई अशीही - पोलिसांनी घरगुती प्रकरण म्हणून तक्रार घेण्यास दिला नकार, पण आईने मानली नाही हार 

गीता दुबे मजुरी करून घर चालवतात. 19 वर्षीय मुलगा सूरज आणि एक मुलगी हाच त्यांचा परिवार. मुलीच्या लग्नानंतर परिवारामध्ये आई आणि सुरज दोघे जण आहेत. पाच वर्षांपूर्वी गीता यांच्या पतीने निधन झाले. तेव्हापासून त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. परिवारासाठी त्यांना मजूरी करावी लागत आहे. यासाठी सकाळी कामावर निघून जातात. त्यांच्या कामावर गेल्यानंतर सूरज एकटाच घरी असतो. घरात एकटाच असल्यामुळे तो वाईट सवयींना बळी पडला. त्याच्या  भोळेपणाचा फायदा घेत काही लोकांनी त्याला चोरी आणि नशा करणे शिकवले. त्याला सुधारण्यासाठी गीता यांनी अनेक प्रयत्न केले. पण त्यानंतरही त्याच्यात काही फरक पडला नाही. सूरज हळूहळू ड्रग्स अॅडीक्ट बनला. सूरजला या सर्व गोष्टींपासून सोडविण्यसाठी प्रेमाशिवाय त्याच्यावर हात देखील उचलला. गीता दुबे यांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे रूपये पैसाअडकाची संपत्ती नाही पण संस्कारांची संपत्ती आहे. यासाठी मी त्याला सुधारण्यासाठी हा दृढ़ निश्चय केला आहे. 


सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर घेतली कठोर भूमिका

गीताने सांगितले की, सूरजला सुधारण्यासाठीचे माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे त्याला तुरुंगात पाठविण्याचा हा शेवटचा मार्ग मला दिसत होता. आपल्या मुलाला वाईट मार्गपासून दूर करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचे ठरविले. यासाठी मी पोलिस ठाण्यात गेले असता तेथील अधिकाऱ्याने हे घरगुती प्रकरण असल्याचे सांगत माझी तक्रार घेण्यास नकार दिला. पण मी त्यानंतरही हिम्मत सोडली नाही.