Home | Maharashtra | Mumbai | Mother Son Found Dead In Mumbai Apartment, Suicide Note Recovered

घरातून येत होता उग्र दुर्गंध, दार उघडताच अशा अवस्थेत सापडले माय-लेकाचे मृतदेह; लॅपटॉपमध्ये सापडले सुसाइड नोट

वृत्तसंस्था, | Update - Jun 25, 2019, 11:57 AM IST

मुंबईतील मीरा रोड येथील घरात मायलेकाने केली आत्महत्या

  • Mother Son Found Dead In Mumbai Apartment, Suicide Note Recovered

    मुंबई - येथील मीरा रोड परिसरात असलेल्या मारीगोल्ड अपार्टमेंटमध्ये मंगळवारी आई आणि मुलाचे मृतदेह सापडले आहेत. इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना उग्र दुर्गंध येत असल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी पोलिसांना बोलावले. त्यानंतर ही घटना समोर आली आहे. पोलिसांना घरातील एका लॅपटॉपमधून सुसाइड नोट देखील सापडला आहे. त्यानुसार, मुलाने आधी आईची हत्या करून स्वतःचा जीव घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव व्यंकटेश्वरम गोपाल अय्यर (42) होते. तर व्यंकटेशची आई मीनाक्षीचे वय 75 वर्षे होते. या दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, व्यंकटेश 2017 मध्ये मुंबईत आपल्या आईसह स्थायिक झाला होता. तो मारिगोल्ड येथील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होता. त्याचा भाडे करारनामा एप्रिलमध्येच संपला. तरीही घरमालकाला त्याने अतिरिक्त 2 महिन्यांची मुदत मागितली. गेल्या 4 दिवसांपासून बिल्डिंगच्या कुणाशीही त्यांचा संपर्क नव्हता. त्यातच अपार्टमेंटमधून येणाऱ्या दुर्गंधाने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतरच पोलिसांना फोन करून बोलावण्यात आले. या दोघांनी आत्महत्या का केली याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलिस यासंदर्भात सविस्तर तपास करत आहेत.

Trending