आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाललीलेत माता मग्न, दरवर्षी 577 तास खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन  - एका स्त्रीचे जीवन तिच्या कुटुंबाला समर्पित असते, असे म्हटले जाते व हे खरेही आहे; परंतु यात जवळपास प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या मुलांना माेठे स्थान असते, हेदेखील नाकारले जाऊ शकत नाही. कारण कुटुंबातील सासू-सासरे, पती आदी सदस्यांपेक्षा तिचा दिवसभरातील सर्वाधिक वेळ मुलांसाठीच खर्च हाेत असताे. एक आई तिच्या मुलांच्या बाललीला उदा.- त्यांचे खेळणे-बागडणे, धावणे, शालेय उपक्रम-कार्यक्रमांसह इतर हालचाली पाहण्यात दरवर्षी सरासरी ५७७ तास घालवत असल्याचे वाचून तुमचा यावर विश्वास बसणार नाही; परंतु हे खरे आहे. ब्रिटनच्या एका संस्थेने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समाेर आला आहे.  


याबाबत ब्रिटनमधील ‘नेक्स्ट’ संस्थेने दाेन हजार मातांचा अभ्यास केला. त्यानुसार  सरासरी प्रत्येक आई तिच्या मुलांचे खेळणे-बागडणे आदी बाललीला पाहण्यात वर्षातील ११२ दिवस घालवते, तर बहुतांश माता त्यांच्या मुलांना सायकल चालवण्याची किंवा टॅक्सीचालकाची नक्कल करताना बघण्यात ४७ दिवस खर्च करतात. हे प्रमाण चारवर्षीय मुलांपासून ते किशाेरावस्थेपर्यंतच्या (१६ वर्षांपर्यंत) कालावधीच्या आधारे ठरवण्यात आले आहे. त्यात एका आईचे तिच्या मुलांभाेवती घुटमळण्यातच (अर्थातच काही तरी कामानिमित्त) वर्षातील ४७ दिवस वाया जातात. तसेच दिवसातून सरासरी दाेनदा मुलांच्या ताेंडून ‘आय लव्ह यू’ एेकत असतात, ज्याची त्यांच्या बालपणी एकूण ८,७८८ वेळा पुनरावृत्ती झालेली असते. याशिवाय प्रत्येक आई आठवड्यातून कमीत कमी १५ वेळा आपल्या मुलांना प्रेमाने बाहुपाशात घेते व हे प्रमाण बाल्यावस्थेत एकूण १०,१४० वेळा असते. त्याचप्रमाणे मुलांमुळे दरवर्षी किमान १६ वेळा प्रत्येक आईच्या झाेपेत अडथळे येत असतात व हे प्रमाण मुले १६ वर्षांची हाेईपर्यंत २०८ पर्यंत पाेहाेचते, असेही या संशाेधनातून समाेर आले.  


आई बनणे साैभाग्याचे; जबाबदारी कठीण
आई बनणे हे प्रत्येक स्त्रीसाठी साैभाग्याचे असते; परंतु मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे खूप कठीण आहे. असे असले तरी प्रत्येक स्त्री अर्थात आई ही जबाबदारी माेठ्या आनंदाने, स्वखुशीने पार पाडते व यातून तिला माेठे आत्मिक समाधानही मिळत असते. याच कारणामुळे प्रत्येक आई मुलांचे सारे काही आनंदाने सहन करत त्यांच्यासाठी माेठ्यातील माेठे बलिदान देण्यास एका पायावर तयार असते, असे ‘नेक्स्ट’ संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...