Home | International | Other Country | Mother stuck to phone Lets her one-year-old daughter drown In Pool Shocking Video

आई फोनमध्ये गुंतली, तिकडे एक वर्षाचे मूल बुडाले; अतिशय तडफडून झाला मृत्यू, आईला जरासुद्धा नव्हती जाणीव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 12, 2018, 01:29 PM IST

पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी आई तिला छोट्याशा स्विमिंग पूलमध्ये घेऊन गेली.आईला जाणीव झाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

 • Mother stuck to phone Lets her one-year-old daughter drown In Pool Shocking Video

  न्यूज डेस्क - अवघी वर्षभराची चिमुरडी. पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी आई तिला छोट्याशा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करण्यासाठी घेऊन गेली. परंतु या आनंदावर आईच्या निष्काळजीपणामुळे विरजण पडले. आनंदाचे वातावरण दु:खात बदलले. आईला जाणीव झाली तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. दक्षिण-पूर्व चीनमध्ये घडलेल्या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. बुडालेल्या बालकाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तेथे त्याची प्राणज्योत मालवली.


  आई फोन पाहण्यात होती मश्गुल
  चीनच्या फुजिआन प्रांतातील फुजोहू शहराती एका क्रीडा केंद्रात आई तिच्या वर्षभराच्या शिओई नावाच्या या चिमुरडीला घेऊन गेली होती. लहान मुलांच्या छोट्याशा स्विमिंग पूलमध्ये डुंबण्यासाठी आईने बाळाला सोडले आणि लगेच मोबाइलमध्ये मान घातली. चिमुरडीला स्विमिंग करतानाची संरक्षण रबराची रिंगही घातलेली होती. परंतु काही क्षणांतच ती उलटली आणि पाय वर डोके पाण्यात अशा अवस्थेत चिमुरडीचा संघर्ष सुरू झाला. तब्बल 90 सेकंद चिमुरडी मृत्यूशी झुंजत होती. नंतर आईचे लक्ष गेले तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली.

  मित्रांना करत होती चॅटिंग, बेसावध क्षणीच झाला घात
  या पूलमध्ये इतरही मुले होती. आईला वाटले ती त्यांच्यासोबत आता आरामात खेळेल. दरम्यान, आईने फोन काढून चॅटिंग सुरू केली आणि तेवढ्यात ही दुर्घटना घडली.
  आईचे नाव मिसेस वू असे आहे. त्या म्हणाल्या, मी एक-दोन मिनिटेच फोन पाहिला असेल, तेवढ्यात ही घटना घडली. यानंतर मुलीला इंटेसिव्ह केअरमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तिच्या हृदयाची ना धडधड सुरू होती, ना काही हालचाल. चेहरा निळा पडलेला होता. डॉक्टरांनी प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. चिमुरडीचा करुण अंत झाला.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, हा Shocking Video व आणखी Photos...

 • Mother stuck to phone Lets her one-year-old daughter drown In Pool Shocking Video
 • Mother stuck to phone Lets her one-year-old daughter drown In Pool Shocking Video
 • Mother stuck to phone Lets her one-year-old daughter drown In Pool Shocking Video

Trending