आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : दोन चिमुरड्यांना दुधातून विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - कौटुंबिक कारणावरून पतीसाेबत वाद झाल्याने आपल्या ४ आणि ५ वर्षांच्या मुलांना दुधातून विष पाजवून आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यातील नऱ्हे येथे मंगळवारी घडली. दरम्यान, शेजाऱ्यांनी तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रांजली (५) आणि आदित्य (४) या मुलांसह महिला आपल्या पतीसह नऱ्हे येथे राहते. महिलेचा पतीसोबत कौटुंबिक कारणावरून  वाद झाला. त्यामुळे पती घराबाहेर निघून गेला. 


त्यानंतर महिलेने दोन्ही मुलांना दुधातून विष पाजले. त्यानंतर स्वत:ही ते प्रशान केले. तिघांनाही उलट्या होऊ लागल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती  स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान,  या घटनेनंतर पतीचा अजून शोध लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा पोलिस सर्व बाजुंनी तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...