Maharashtra Special / घरगुती वादानंतर आईनेच जुळ्या मुलींना फेकले विहिरीत, नंतर स्वतःही घेतली उडी

गावकऱ्यांनी महिलेला काढले बाहेर

दिव्य मराठी वेब

Jul 14,2019 06:34:00 PM IST

बुलडाणा- येथील एका महिलेने सहा महिन्यांच्या जुळ्या मुलींना कथितरित्या विहिरीत फेकल्यानंतर, स्वतःही उडी मारल्याची घटना समोर आली आहे. पोलिस अधिक्षक सुनील जाधव यांनी सांगितले की, जामोद गावात शनिवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे, तर आईला वाचवण्यात यश आले आहे.


सुनील जाधव यांनी सांगितले की, शीतल मोहन भगत(30) यांचे कुटुंबीयांसोबत काही कारणास्तव वाद झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना घराबाहेरील विहिरीत टाकून स्वतःही उडी घेतली. गावातील काही लोकांनी हे दृष्य पाहून महिलेला वाचवले आणि पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

X
COMMENT