आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातेचे क्राैर्य! मुलगी अाजी-अाजाेबांकडे जात असल्यामुळे अाईने दिले चटके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- चिमुकली मुलगी अापल्या अाजी-अाजाेबांकडे जात असल्यामुळे तिच्या अाईने तिला चटके दिल्याचा प्रकार शुक्रवारी २८ सप्टेंबरला जुने शहरात उजेडात अाला. 


या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवसेना वसाहत अाहे. तेथील एका ३८ वर्षीय महिलेची सात वर्षांची मुलगी तिच्या अाजी-अाजाेबांकडे जात हाेती. मात्र ही बाब ती मुलगी तिच्या अाईला सांगत नव्हती. त्या मुलीचे अाजी-अाजाेबा जवळच राहत असल्यामुळेे ती मुलगी नेहमीच त्यांच्याकडे जात असे. त्यामुळे तिच्या अाईने त्या चिमुकल्या मुलीला गरम सराट्याने चटके दिले. हा क्रूर प्रकार शुक्रवारी उजेडात अाला. 


याची माहिती शेजारी राहणाऱ्यांना कळली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अन्वर शेख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलीला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात मुलीच्या अाईविरुद्ध भारतीय दंड विधान व जुवेनाईल जस्टीस अॅक्टच्या ( मुलांचे संगोपन आणि संरक्षण) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु हाेती. 

 

बातम्या आणखी आहेत...