आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mother Was In Bisexual Ralationship, Family Did Not Get Proper Behavior; Daughter Becomes The Prime Minister Of The Country

समलैंगिक नात्यात होती आई, कुटुंबाला मिळत नव्हती योग्य वागणूक; मुलगी बनली देशाची पंतप्रधान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एंटी रिने यांनी मंगळवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला

हेलसिंकी- सना मरीन अवघ्या 34 व्या वर्षी फिनलँडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांनी 57 वर्षीय एंटी रिने यांची जागा घेतली. पंतप्रधानपदी विराजमान होताच त्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत. पण, इतक्या कमी वयात राजकारणाच्या शिखरावर पोचणाऱ्या सना यांचे बालपन खूप हलाकीचे होते. त्यांना आपल्या आयुष्यात खूप त्रासाचा सामना करावा लागला होता.


सना मरीन बालपनी किरायाच्या घरात आपल्या आईसोबत राहत होत्या. नंतर त्यांच्या आईचे एका महिलेसोबत समलैंगिक नाते सुरू झाले. यामुळे त्यांना समाजात खूप अवहेलनेचा सामना करावा लागला. त्यांना आसपासच्या परिसरात आणि समाजात योग्य वागणूक मिळत नव्हती.


फिनलँडमधील मॅगझीन 'मेनासेट फी'ला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सना यांनी सांगितले की,'मी माझ्या कुटुंबाबद्दल मोकळेपणाने बोलू शकत नाही. यामुळे मला स्वतःचे अस्तित्व असल्याचेही कळत नव्हते. त्यावेळेस मी स्वतःला अयोग्य मानत होते.'


सना आपल्या तरुणपणी मित्रांसोबत एन्जॉय करू शकत नव्हती. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थीत खूप हलाकिची असल्यामुळे त्यांना जास्त सुखसोई मिळाल्या नाहीत. आपल्या कुटुंबातील सना पहिल्या महिला आहेत ज्या इतक्या शिकलेल्या आहेत. सना म्हणाल्या की, त्यांच्या आईने त्यांना खूप मदत केली आणि विश्वास दिला की, त्यांना जे करायचं आहे, ते करू शकतात.

मरीन 27 व्या वर्षी महापौर बनल्या


मरीन यांनी टॅम्परे विश्वविद्यालयतून प्रशासकीय विज्ञानाची मास्टर डिग्री मिळवली. त्या अवघ्या 27 व्या वर्षीय टॅम्परेच्या नगर परिषदप्रमुके म्हणून निवडल्या गेल्या. त्या जून 2019 मध्ये वाहतूक आणि दूरसंचार मंत्री बनल्या.

तरुण पंतप्रधानांच्या यादीत यूक्रेनचे होन्चेरुक दुसऱ्या नंबरवर


जगात दुसरे सर्वा तरुण पंतप्रधान यूक्रेनचे ओलेक्सी होन्चेरुक आहेत. ते फक्त 35 वर्षांचे आहेत. मरीन यांना काही पत्रकारांनी त्यांच्या वयावरुन प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मी कधीच वय आणि जेंडरचा विचार केला नाही. मी काही करण्यासाठी राजकारणात आले आणि लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला. 

बातम्या आणखी आहेत...