आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्यांपूर्वीच झाला पतीचा मृत्यू, विरहात पत्नीने 4 मुलींसह केली सामुहिक आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - येथील माळेगाव गाव शिवारात सामुहिक आत्महत्येची एक धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. यामध्ये एका 32 वर्षीय महिलेने आपल्या 4 मुलींसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्या मुलींपैकी एकीचे वय 9 वर्षे, दुसरीचे 6 वर्षे, तिसरीचे 4 वर्षे आणि सर्वात लहान मुलीचे वय केवळ 1 वर्ष होते. गावात सोमवारी सकाळी हे वृत्त समोर येताच शोककळा पसरली आहे. तिने पतीच्या विरहात हे टोकाचे पाउल उचलले असे सांगितले जात आहे.

दीड महिन्यांपूर्वीच झाला पतीचा मृत्यू
माळेगाव गाव शिवारातील विहीरीत सोमवारी सकाळीच 5 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. यात 32 वर्षी महिलेसह तिच्या मुलींचा समावेश होता. ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे, पीडित महिलेचे नाव उज्जवला असून काही वर्षांपूर्वी तिचा विवाह बबन डोके यांच्याशी झाला होता. त्या दोघांना 4 मुली झाल्या. यात वैशाली 9, दुर्गा 6, आरुषी 4 आणि पल्लवी 1 वर्ष यांचा समावेश होता. परंतु, अवघ्या दीड महिन्यांपूर्वी बबन डोकेचा अचानक मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर घर आणि मुलींची संपूर्ण जबाबदारी उज्ज्वलावर आली होती. नेहमीच चिंताग्रस्त राहणाऱ्या उज्ज्वलाने पतीच्या विरहात आपल्या चारही मुलींसह तिने विहीरीत उडी घेतली.

बातम्या आणखी आहेत...