आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mothers Friend Abusing Girl From Last Five Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईचा मित्र 5 वर्षांपासून करायचा आत्याचार, अज्ञात व्यक्तीने केली मदत..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- ऐशबाग परिसरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आईचा मित्र 5 वर्षांपासून आत्याचार करायचा. हैराण करणारी बाब म्हणजे मुलीच्या आई-वडिलांना या सगळ्याची माहिती होती तरीदेखील त्यांनी काहीच केले नाही. त्यानंर मुलीच्या एका ओळखीच्या व्यक्तीने होशंगाबादमध्ये राहणाऱ्या मुलीच्या आजा-आजोबाला याची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवली असून आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, पुष्पा नगरमध्ये 17 वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. तिच्या घरी आरोपी मुकेश अंगदेले याचे येणे-जाणे होते. मुलीची आई नोकरी करते आणि आरोपी आईचा मित्र आहे. मुलीने आरोप लावला की ती 12 वर्षांची असताना मुकेश तिच्या घरी आला आणि तिच्यावर आत्याचार केला. त्यानंतर अनेकवेळा त्याने तिच्यावर आत्याचार केला, याबद्दल तिने आई-वडिलांना सांगितले पण त्यांनी मुलीलाच रागवून चुप केले.


आत्याचार करताना पाहून आजी-आजोबाला सांगितले
पोलिस आधिकारी अजय नायर यांनी सांगितले की, एका व्यक्तीने मुकेशला मुलीसोबत आत्याचार करताना पाहीले आणि तिच्या आजी-आजोबाला सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.