Home | Khabrein Jara Hat Ke | Mothers shocking behavior with three month old daughter

एक्स वाइफने पाठवलेले फोटो पाहून घाबरून गेला पती, मॅसेज वाचल्यानंतर तर त्याच्या पायाखालची जमीनच हादरली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:13 PM IST

या चिमुरडीने तिच्या आईच्या अंगावर सू-सू केली होती, त्यानंतर तिच्या जिवालाच धोका निर्माण झाला.

 • Mothers shocking behavior with three month old daughter

  बालाकोव्हो - रशियामध्ये एका आईने अगदी लहानशा गोष्टीवर नाराज होत तीन महिन्यांच्या चिमुरडीला बाल्कनीत रडत थंडीत कुडकुडत ठेवले. मुलीची चूक फक्त एवढी होती की, तिने आईच्या अंगावर सू-सू केली होती. त्यावर निर्दयी आईने मुलीला बाल्कनीत थंडातच सोडले. तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडादेखिल नव्हता. या कृत्यानंतर महिलेने याचा फोटो मुलीच्या वडिलांना पाठवला. फोटोबरोबरचा मॅसेज वाचून पिता प्रचंड घाबरून गेला.


  आईला आली नाही द्या
  - या परिसरात प्रचंड थंडी वाढलेली आहे. तरीही आईला तीन महिन्यांच्या चिमुरड्या मुलीवर जराही दया आली नाही. तिने कपड्यांविनाच मुलीला थंडीत कुडकुडत बाल्कनीत सोडले.
  - महिलेने याचे फोटो मुलीचे वडील आणि तिचा एक्स हसबंड अॅलेक्झँडर पोट्रियासोव्ह (28) ला पाठवले. त्यासोबत लिहिले, ये आणि तुझ्या मुलीला शेवटचे पाहून घे. मी तिला बाल्कनीत सोजून कुलूप लावले आहे. कदाचित तिला थंडी वाजत आहेत, तिने माझ्या अंगावर सू-सू केली होती.
  - क्लिमोव्हाने अॅलेक्सेंडरला पाठवलेल्या फोटोत एक चिमुरडी बास्केटमध्ये कपड्यांविना ठेवलीली दिसत होती. त्यात ती रडताना दिसत होती.


  पत्नीने धडा शिकवण्यासाठी उचलले पाऊल
  - अॅलेक्झॅँडरने नुकतेच त्याच्या एक्स वाईफने पाठवलेले फोटो इंटरनेटवर शेअर केले. स्थानिक प्रशासनाने पत्नीकडून मुलीचे पालकत्व परत घ्यावे यासाठी फोटो शेअर केल्याचे त्याने सांगितले. ती माझ्या मुलीबरोबर काहीही करू शकते, तिला कुठे तरी फेकूनही देऊ शकते, असे तो म्हणाला.
  - मुलीचे फोटो समोर आल्यानंतर महिलेने अॅलेक्झॅँडरवरच सर्व आरोप केले आहेत. त्याने आम्हाला एकटे सोडले होते. तर अॅलेक्झँडरचे म्हणणे आहे की, त्याच्याकडे प्रंड काम असल्याने तो मुलीची देखभाल करू शकत वाही.
  - क्लिमोव्हाच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, मुलगी झाल्यानंतर अॅलेक्झँडर तिला सोडून वोल्स्क नावाच्या शहरात शिफ्ट झाला होता. दोघांमध्ये वाद होतेच ते घटस्फोटानंतर अधिक वाढले.
  - महिलेने पाठवलेले फोटो सार्वजनिक झाल्यानंतर पोलिसांच्या हालचालीही वाढल्या. क्लिमोव्हाला पोलिसांनी दंड ठोठावला आहे. पोलिस महणाले की, येथे थंडी वाढली की, तापमान उन्हे अंशामध्ये जाते. पण चिमुरडीची प्रकृती ठिक असल्याचे पोलिस म्हणाले.

 • Mothers shocking behavior with three month old daughter
 • Mothers shocking behavior with three month old daughter

Trending