आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखादा व्यक्ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या जीवनातील शांती नष्ट होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत रविदास इतर साधू-संतांची खूप सेवा करत होते. लोकांसाठी चप्पल-बूट बनवण्याचे काम करायचे. एके दिवशी त्यांच्याकडे एक साधू आले. संत रविदास यांनी साधूला जेवू घातले आणि त्यांनी बनवलेले बूट साधूला घालण्यासाठी दिले.


> संत रविदास यांचे निस्वार्थ प्रेम पाहून साधू खूप प्रसन्न झाले. त्यांनी संत रविदास यांना पारस दगड दिला. हा दगड लोखंडाच्या अवजारांना लावताच सर्व सोन्याचे झाले. हे पाहून संत रविदास यांना खूप दुःख झाले आणि त्यांनी तो दगड घेण्यास नकार दिला. संत म्हणाले आता मी सोन्याच्या अवजारांनी चप्पल-बूट कसे बनवणार.


> साधू संत रविदासांना म्हणाले, या दगडाच्या मदतीने तुम्ही धनवान व्हाल आणि चप्पल-बूट बनवण्याची गरज पडणार नाही. हे सांगून साधूने तो दगड संतांच्या झोपडीवर ठेवला आणि निघून गेले.


> एक वर्षानंतर साधू पुन्हा संत रविदास यांच्याकडे पोहोचले आणि पाहिले की, रविदास एक वर्षांपूर्वी जसे होते तसेच आहेत.
 

> साधूने तो पारस दगड कुठे आहे असे विचारले?


> संत रविदास म्हणाले तेथेच असेल जेथे तुम्ही ठेवून गेला होतात. हे ऐकून साधू चकित झाले.


> साधू म्हणाले तुमच्याकडे धनवान होण्याची एवढी चांगली संधी होती आणि तुम्ही या संधीचा लाभ का घेतला नाही?


> संत रविदास म्हणाले- मी खूप सोने तयार केले असते तर त्याची रखवाली कोणी केली असती, मी श्रीमंत होऊन निर्धनांना दान दिले असते तर हळू-हळू क्षेत्रामध्ये प्रसिद्ध झालो असतो. त्यानंतर माझ्याकडे नामस्मरण करण्यासाठी वेळ राहिला नसता. मी तर चप्पल-बूट बनवण्याच्या कामात आनंदी आहे कारण या कामामध्ये माझी खाण्यापिण्याची व्यवस्था होते आणि इतर वेळात मी देवाचे नामस्मरण करतो. प्रसिद्ध झालो असतो तर जीवनातील शांती नष्ट झाली असती. मला जीवनात शांती हवी आहे, ज्यामुळे मी भक्ती करू शकेल. यामुळे मी पारस दगडाला हातही लावला नाही.


> या कथेची शिकवण हीच आहे की, एखादा व्यक्ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या जीवनातील शांती नष्ट होते. ज्या लोकांना शांती हवी असेल त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी.

बातम्या आणखी आहेत...