Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Motivational Concepts, Life Management, How to Get Success

एका राजाला नव्हते आपत्य, त्याने ठेवली एक अट आणि माहालाच्या आत भरवली जत्रा, त्यानंतर मिळाला उत्तराधिकारी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 06:15 PM IST

यशस्वी व्हयचे असेल तर संकटाना न घाबरता आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत करा.

 • Motivational Concepts, Life Management, How to Get Success

  एके काळी विजयनगर नावाच्या राज्यात विजयसेन हा राजा राज्य करत होता. तो खुप वृद्ध झाला होता आणि त्याला आपत्य नव्हते. त्याला राज्याची आणि नवीन उत्तराधिकाऱ्याची चिंता सतावू लागली. एक दिवशी त्याने घोषणा केली की, जो व्यक्ती रविवारी संध्याकाळी त्याला एका ठरलेल्या वेळेवर येऊन भेटेल त्याला तो त्याचा राज्याचा एक भाग देऊन टाकेल.

  रविवारच्या संध्याकाळी राजाने त्याच्या माहालात एका जत्रेचे आयोजन केले. त्यात नाच गाण्यासोबतच खाण्या पिण्याची उत्तम व्यवस्था केली होती. त्यात हजारो लोक आले होते. काही लोक खाण्या पिण्यात व्यस्त होते तर काही नाच गाण्यात. कोणालाच राजाला भेटायचे लक्षात आले नाही.

  या सर्वामध्ये एक तरूण आला होता. त्याचे लक्ष फक्त राजाला भेटण्याकडेच होते. त्यामुळे त्याने खाण्या-पिण्यात किंवा नाच-गाण्याकडे लक्ष दिले नाही. ठरलेल्या वेळत तो राजाला भेटायला गेला. पण दाराबाहेर त्याला राजाच्या सैनिकांनी अडवले. पण त्यांना धक्का देऊन तो राजाकडे गेला. तेव्हा राजा प्रसन्न झाला आणि म्हणाला की, तु एकमात्र व्यक्ती आहेस जो कोणालाही न घाबरता मला भेटायला आला आहेस. त्यामुळे मी तुला माझ्या राज्याचा उत्तराधिकारी बनवत आहे.


  लाइफ मॅनेजमेंट
  यशस्वी तोच होतो जो आपले लक्ष निश्चित करतो आणि त्यावर ठाम राहून आपल्या लक्षाकडे जाणाऱ्या मार्गामध्ये येणाऱ्या संकटांचा सामना करून आपले धेय साध्य करतो.

Trending