आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्णाला अनेक राण्या होत्या, रुक्मिणी श्रीकृष्णावर नि:स्वार्थ प्रेम करायची, तर सत्यभामाने श्रीकृष्णालाच केले होते दान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क - नेहमीच पती-पत्नीच्या नात्यात तणावाची एक सूक्ष्म दोरी असते. ही दोरी थोडी जरी ताणली तरी दुराव्यात वाढ होत जाते. जास्त दबावामुळे हे बंधन मोडकळीस येऊ शकते. हे दोरी असते अपेक्षेची. आपण एकमेकांशी नाते जोडतो तेव्हा आपल्या अपेक्षाही त्यांच्यावर लादत असतो. नाते कोणतेही असो, आपण त्यात नि:स्वार्थी कधीच राहू शकत नाही. ही अपेक्षाच पती-पत्नीतील मतभेदांचे कारण ठरू शकते.

 

श्रीकृष्ण-रुक्मिणीप्रमाणे असावे दांपत्य जीवन
- श्रीमद्भागवतानुसार, भगवान श्रीकृष्णाच्या 8 पटराण्या होत्या. यात श्रीकृष्णाचा बहुतांश वेळ रुक्मिणी व सत्यभामासोबतच जायचा. रुक्मिणी श्रीकृष्णावर निर्मळ आणि निष्काम प्रेम करत होत्या. 
- त्यांना भगवंताची जेवढी सोबत मिळेल, त्यास सौभाग्य समजून समाधान मानायच्या. परंतु सत्यभामाचा स्वभाव याविरुद्ध होता. सत्यभामा नेहमी श्रीकृष्णाकडून अपेक्षा ठेवायच्या की, जास्तीत जास्त वेळ त्यांनाच दिला जावा.
- या मोहामुळे एकदा नारदाच्या बोलण्याला भुलून श्रीकृष्णालाच दान केले होते. परिणाम असा झाला की, अपेक्षा तर पूर्ण झाली नाही, सोबतच सवतींचे बोलणेही खावे लागले होते.
- गोष्ट फक्त एवढीच आहे... आप्तेष्टांकडून अपेक्षा पूर्ण झाल्या तर समाधान मिळतेच असे नाही, परंतु असमाधानी मात्र जास्तच होता.
- यामुळेच पती-पत्नीच्या नात्यात नेहमी खटके उडत राहतात, कारण आपण याचा आधार अपेक्षा बनवला आहे. दांपत्य जीवनात जेवढ्या जास्त अपेक्षा ठेवाल, तेवढा जास्त त्रास तुम्हाला सहन करावा लागतो.

 

बातम्या आणखी आहेत...