आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारतात वनवासादरम्यान पांडव पोहोचले कैलास पर्वतावर, भीमाला होता आपल्या शक्तीवर गर्व, पण द्रौपदीची छोटीशी इच्छा पूर्ण करता आली नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क - माणसाने शक्तिशाली असताना संस्कार आणि विनय सोडू नये. जे शक्तीच्या गर्वामुळे या दोन्ही गोष्टी सोडतात, त्यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रावण शक्तिशाली होता, परंतु ताकदीच्या गर्वामुळे श्रीरामांच्या हातून मारला गेला, त्याची लंका बरबाद झाली. महाभारतात भीमाशी निगडित एक प्रसंग आहे, जो हे सांगतो की, शक्तीसोबत गर्व असेल तर काय होऊ शकते.

 

द्रौपदीने भीमाला मागितले फूल
पांडवांचा वनवास सुरू होता. पाचही भाऊ आणि द्रौपदी जंगलांमध्ये भटकत होते. कैलास पर्वतावर पोहोचले. तेव्हा यक्षांचा राजा कुबेरही कैलासावर राहत होता. कुबेराच्या नगरात एक सरोवर होते. ज्यात कमळाचे फूल होते. द्रौपदीला त्या फुलांचा सुगंध आल्यावर तिने भीमाकडे त्या फूलाची मागणी केली.

 

एका वानराने अडवली भीमाची वाट
भीम द्रौपदीसाठी ते फूल आणण्यास निघाला. वाटेत भीमाने पाहिले की, एक वानर वाटेत शेपटी पसरवून झोपलेला आहे. एखाद्या प्राण्याला ओलांडून पुढे जावे लागणे मर्यादेविरुद्ध होते. यामुळे भीम वानराला म्हणाला की, तुम्ही तुमची शेपूट हटवा. मला येथून जायचे आहे. वानराने ऐकले नाही. यामुळे भीम चिडला. म्हणाला की, तुला माहिती नाही का, मी महाबली भीम आहे.

 

भीमाला वानराकडून स्वीकारावी लागली हार
वानर म्हणाले की, एवढा शक्तिशाली आहेस तर स्वत:च माझी शेपूट वाटेत हटव आणि पुढे जा. भीम शेपूट हटवण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु तसुभरही शेपूट हलली नाही. तेव्हा भीमाने हार मानली. तो वानराला प्रार्थना करू लागला. यानंतर वानर आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले. साक्षात पवनपुत्र हनुमान. त्यांनी भीमाला समजावले की, आपल्या शक्तीवर कधीच गर्व केला नाही पाहिजे. ताकद आणि विनम्रता असे गुण आहेत, जे विपरीत स्वभावाचे असतात, परंतु जर ते एका स्थानावर आले तर तो व्यक्ती महान बनतो. 

 

बातम्या आणखी आहेत...