धैर्याविना यश मिळत नाही, घाईघाईमध्ये काम करण्याची चूक करू नये, कधीही अशा शब्दांचा प्रयोग करू नये, ज्यामुळे दुसऱ्याचे मन दुखावेल 

सुख आणि यश एकत्र हवे असेल तर या 6 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.. 

Mar 31,2019 03:24:00 PM IST

रिलिजन डेस्क : जीवनात सुख-सुविधा मिळवण्यासाठी लक्ष्मीसह सर्व देवी-देवतांची प्रसन्नता खूप गरजेची असते. उज्जैनच्या ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, महाभारत आणि गरुड पुराणमध्ये सांगितलेले आहे की, न्याय आणि नीतीनुसार काम करणारे लोक देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करतात. देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच दैनंदिन जीवनात काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या तर महालक्ष्मीची कृपा मिळू शकते.

जाणून घ्या कोणकोणत्या आहेत त्या खास गोष्टी...

1. धैर्य ठेवा.

कोणत्याही कामात स्थिर यश तेव्हाच मिळाते जेव्हा, शेवटच्या वेळेपर्यंत ती व्यक्ती धैर्य सुटू देत नाही. ज्यावेळी धैर्य सोडून घाई केली, तेव्हापासूनच अपयशी होण्याच्या शक्यता वाढत जातात.

2. राग राग करू नये.

राग, व्यक्तीच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिमाण करतो. रंगीत व्यक्तीच्या आयुष्यात आणि घरात शांतता राहत नाही. जिथे अशांती असते, तिथे दारिद्र्य राहते. लक्ष्मीची कृपा हवी असेल तर राग सोडून द्यावा लागेल. रागावर आवर घालण्यासाठी मंत्र जप आणि ध्यान करायला हवे.

3. विचारांची आणि शरीराची पवित्रता.

आपण कधीही इतरांसाठी काही वाईट चिंतले नाही पाहिजे. महिलांविषयी चुकीचे विचार ठेवणाऱ्यांना लक्ष्मीची कृपा नाही मिळत. त्यामुळे विचारांचे पावित्र्य जपले पाहिजे. जे लोक मन आणि शरीराची पवित्रता राखतात, त्यांना लक्ष्मीची प्रसन्नता प्राप्त होते. मनाची पवित्रता चांगल्या विचारांनी होते आणि शरीराची पवित्रता साफ-सफाईने होते.

4. दया.
गरीब आणि गरजूंसाठी दया भाव असणे गरजेचे असते. वेळोवेळो अशा लोकांची आपल्याला जमेल तशी मदत करत राहिले पाहिजे.

5. सरळ आणि गोड भाषा.

घर-परिवार असो किंवा समाज, आपण सदैव गोड वाणीचा उपयोग केला पाहिजे. कळत नकळत कधीही अशा शब्दांचा उपयोग करू नये, ज्यामुळे कुणाचे मन दुखावले जाईल.

6. मित्रांचा द्वेष करू नये.

X