आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीने पैसा कमवावा परंतु कुटुंबालाही वेळ द्यावा, कारण गेलेला काळ परत येत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही कथा पुराणांमधील आहे. एका नगरात एक व्यापारी राहत होता. तो राहत असलेल्या नगरमध्ये त्याचा व्यापार काहीच चालत नव्हता. कधीकधी तर दिवसभरातून एकही ग्राहक त्याच्याकडे यायचा नाही. त्याच्या कुटुंबाला कधीकधी उपाशी झोपावे लागत होते. अनेक दिवस असेच चालू राहिले आणि परिस्थितीही बदलली नाही. तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला दुसऱ्या नगरात जाऊन व्यापार करण्याचा सल्ला दिला. व्यापाऱ्याला मित्राचा सल्ला पटला.


व्यापारी आपल्या पत्नी आणि मुलांना घरीच सोडून दुसऱ्या नगरात व्यापारासाठी गेला. नशिबाने त्याच्या मित्राचा सल्ला कामी आला आणि त्याला भरपूर  फायदा होऊ लागला. तो अनेक दिवस दुसऱ्या शहरांमध्ये राहून व्यापार करू लागला. त्याने स्वतःच्या नगरात येऊन एक नवीन घर बांधले. पत्नी आणि मुलांना घेऊन नवीन घरात राहू लागला. तेव्हा पत्नी त्याला म्हणाली आता आपल्याकडे पर्याप्त धन जमा झाले आहे. यामध्ये आपण सुखी जीवन जगू शकतो. तुम्हाला आता इतर नगरांमध्ये जाऊन व्यापार करण्याची आवश्यकता नाही. मुलांनाही वेळ देण्याची आवश्यकता आहे.


व्यापारी म्हणाला, मला आणखी धन कमावण्याची इच्छा आहे, ज्यामुळे तुम्हाला मी सर्व सुख-सुविधा देऊ शकेल, आपण जे दिवस पाहिले ते मला मुलांना परत दाखवायचे नाहीत. पत्नी म्हणाली, परंतु धन कमावण्यात जो वेळ निघून गेला आहे तो परत येणार नाही, आपण जीवनात सोबत राहण्याच्या आनंदापासून वंचित होत आहोत. व्यापारी म्हणाला, फक्त आणखी काही वर्ष व्यापार करू दे, आपण एवढे धन जमा करू की आपल्या पिढ्या सुखात जीवन व्यतीत करतील.


व्यापारी पुन्हा व्यापार करण्यासाठी निघून गेला. काही वर्ष असेच निघून गेले. खूप धन जमा झाले. व्यापाऱ्याने पुन्हा नदीच्या काठावर एक सुदंर महाल बांधला. संपूर्ण कुटुंब त्या महालात राहू लागले. तो महाल एखाद्या स्वर्गाप्रमाणे होता. व्यापाऱ्याची मुलगी त्याला म्हणाली, बाबा आमचे सर्व बालपण निघून गेले परंतु आम्ही तुमच्यासोबत राहू शकलो नाहीत. आता आपल्याजवळ एवढे धन आहे की, पाच-सहा पिढ्या आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आता तुम्ही आमच्या सोबतच राहा.


व्यापारी म्हणाला, मुली आता मीही थकलो आहे आणि आता तुमच्यासोबत काहीकाळ व्यतीत करण्याची इच्छा आहे. मी उद्या फक्त दोन दिवसांसाठी शेजारच्या गावात जाऊन काही वसुली करायची आहे तेवढी करून येतो. त्यानंतर मी येथेच तुमच्यासोबत राहणार आहे. संपूर्ण कुटुंब आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी व्यापारी शेजाऱ्याच्या गावात गेला आणि त्याच दिवशी मुसळधार पाऊस सुरु झाला आणि ज्या नदीच्या काठावर व्यापाऱ्याने महाल बांधला होता तो पुरामध्ये वाहून गेला. त्या पुरताच त्याचे संपूर्ण कुटुंब वाहून गेले. व्यापारी परत आल्यानंतर सर्वकाही नष्ट झालेले होते.


कथेची शिकवण
सुख आणि आनंद केवळ पैशांनी मिळत नाही. पैसा कमावणे आवश्यक आहे परंतु काळासोबत नाते आणि एकमेकांमधील प्रेमासाठी आपल्या लोकांसोबत वेळ व्यतीत करणेही आवश्यक आहे. कारण धन कोणत्याही वेळी मेहनत करू कमावले जाऊ शकते परंतु जो काळ निघून गेला आहे तो परत येत नाही. वर्तमानात राहा, नात्यांच्या आनंदाचे सुख घ्या आणि आपल्या लोकांना वेळ द्या.

बातम्या आणखी आहेत...