आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Motivational Story About Bad Habits, Inspirational Story

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ प्रवचन ऐकल्याने वाईट सवयी सुटत नाहीत, व्यक्तीला स्वतःचे प्रयत्न करावे लागतात

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

प्राचीन लोककथेनुसार एक व्यक्ती दारूच्या व्यसनामुळे खूप त्रस्त झाला होता. खूप प्रयत्न करूनही त्याचे हे व्यसन सुटत नव्हते. त्याच्या मित्रांनी त्याला गावाच्या बाहेर असलेल्या एका प्रसिद्ध साधुंकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या कृपेने तुला व्यसनातून मुक्ती मिळू शकते असे मित्रांनी सांगितले. > दुसऱ्याच दिवशी व्यक्ती साधुंकडे पोहोचला आणि आपली अडचण सांगितली. साधू खूप विद्वान होते, त्यांनी त्या व्यक्तीला खूप ऊन असलेल्या ठिकाणी नेले. एका ठिकाणी त्याला उभे केले आणि त्याच्या हातामध्ये एक लाडू देत विचारले- तू हा लाडू तुझ्या सावलीला खाऊ घालू शकतो का? > हे ऐकताच व्यक्ती चकित झाला आणि त्याने साधूंना हे अशक्य असल्याचे सांगिलते. > साधू म्हणाले, ठीक अशीच परिस्थिती तुझी आहे. तू सावलीला लाडू खाऊ घालण्याचा प्रयत्न करत आहेस. ज्याप्रकारे सावलीला लाडू खाऊ घालणे शक्य नाही, ठीक त्याचप्रमाणे तू सत्संगामध्ये आलास तरी तुझे व्यसन सुटू शकत नाही.  > या वाईट गोष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुला स्वतःलाच लाडू खावा लागेल म्हणजे तुला स्वतः यासाठी प्रयत्न करावे लागतील. माझ्याकडे आल्यामुळे तुझे व्यसन सुटणार नाही. आता आजपासून संकल्प घे आणि दारू सोडून दे.  > आजपासून कधीच दारूला स्पर्श करणार नाही असा निर्धार कर. व्यसनातून मुक्ती मिळवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

कथेची शिकवण - शिकवण अशी आहे की, केवळ चांगल्या गोष्टी ऐकल्याने आपण वाईटापासून मुक्ती मिळवू शकत नाही. यासाठी स्वतः मनापासून संकल्प घेणे आवश्यक आहे. मनाने ठरवून संकल्प घेतल्याशिवाय व्यसनातून मुक्ती अशक्य आहे.