आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका धनाढ्य व्यक्तीचा मुलगा नशा करायचा आणि मुलींना छेडायचा, त्याच्या वाईट सवयींमुळे तो त्रस्त झाला होता; मग तो एका मोठ्या संताकडे गेला आणि म्हणाला, माझ्या मुलाला सुधरवा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलीजन डेस्क- एका लोक कथेच्या अनुसार एक धनाढ्य व्यक्ती होता, त्याच्याकडे पैशांची कमतरता नव्हती. त्यामुळेच त्याचा मुलगा वाईट सवयींच्या आहारी गेला होता. तो मुलींना छेडायचा, नशा करायचा. त्या व्यक्तीला मुलाच्या भविष्याची चिंता होउ लागली. त्यामुळे तो गावातील एका मोठ्या संताकडे गेला आणि मुलाला सुधारण्यासाठी संताकडे उपाय मागितला.


> संत म्हणाले- तुम्ही तुमच्या मुलाला माझ्याकडे पाठवा. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने मुलाला संताकडे पाठवले. ते संत खूप बुद्धीमान होते, ते त्याला एका बागेत घेऊन गेले. संत मुलाला म्हणाला, हे छोटे झाड आहे, याला उपडून टाक. मुलाने लगेच ते झाड उपडले.

 

> त्यानंतर संतानी त्याला थोडे मोठे झाड उपटायला सांगितले. मुलाने थोडी शक्ती लावून त्या झाडाला उपटले. त्याला कळत नव्हते, हे काय करत आहेत. त्यानंतर संताने एका मोठ्या झाडाकडे इशारा करून त्याला उपटायला सांगितले.

 

> त्यान प्रयत्न केला, पण त्याला ते झाड उपटने जमत नव्हते. तो म्हणला हे खूप अवघड आहे, नाही करता येणार.

 

> त्यानंतर संत त्याला म्हणाले, ठीक असेच आपल्या वाईट सवयींना आहे. आता तुझे वय जास्ती नाहीये, त्यामुळे तुझ्या वाईट सवयींची मुळे कमकुवत आहेत. तु आता या सवयींना सोडलेस तर तुझे आयुष्य चांगले जाईल पण जर तू या सवयींना आता सोडले नाहीस तर नंतर यांना सोडणे अवघड जाईल.

 

> मुलाला त्या संताचे म्हणने पटले आणि त्याने वाईट सवयी सोडण्याचा निर्णय घेतला.

 


यातून काय बोध मिळतो?
यातून हाच बोध मिळतो की, वाईट सवयींना लवकरच सोडले पाहीजे, नाहीतर नंतर या सवयींना सोडणे अवघड जाते आणि या आपले आयुष्य नष्ट करतात.

बातम्या आणखी आहेत...