आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश प्राप्तीसाठी केवळ धाडसच नाही तर हुशारीही आवश्यक आहे 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन लोककथेनुसार एका राजाला 100 पुत्र होते. राजा आणि राणी दोघेही सर्व मुलांवर एकसमान प्रेम करायचे. राजा वृद्ध झाल्यानंतर त्याने आपल्या 100 मुलांपैकी एका मुलाला राजा बनवण्याचे ठरवले. राजा आणि राणी दोघांनाही राजा बनणार मुलगा धाडशी आणि बुद्धिमान असावा असे वाटत होते.


> योग्य राजाची निवड करण्यासाठी राजाने एका संध्याकाळी सर्व मुलांसाठी विशेष जेवणाची व्यवस्था केली. निश्चित वेळेला सर्व राजकुमार जेवणासाठी पोहोचले आणि आपापल्या जागेवर बसले. सर्व राजकुमारांसमोर सेवकांनी जेवण वाढले. राजा लपून सर्व व्यवस्था पाहात होता. राजकुमार जेवणाचा पहिला घास घेणार तेवढ्यात लपून बसलेल्या राजाने आपल्या खास सैनिकांना जेवणाच्या ठिकाणी शिकारी कुत्रे सोडण्यास सांगितले.


> त्याठिकाणी जंगली कुत्रे पोहोचताच काही राजकुमार जेवण सोडून कुत्र्यांची शिकार करू लागले तर काही घाबरून पळून गेले. जेवणाच्या ठिकाणी सर्वत्र एकच गोंधळ उडाला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने सर्व राजकुमारांना दरबारात बोलावले.


> दरबारात सर्व राजकुमार उपस्थित झाले. सर्व प्रजा जाणून घेण्यास उत्सुक होती की, राजा या सर्व मुलांमध्ये कोणाला आपल्या उत्तराधिकारी घोषित करणार.


> राजांनी सर्व मुलांना विचारले- काल संध्याकाळी सर्वांनी जेवण केले की नाही? काही राजकुमार म्हणाले आम्ही तर जेवण करूच शकलो नाहीत कारण आम्ही कुत्र्यांची शिकार करत होतो. काही राजकुमार म्हणाले आम्ही कुत्र्यांच्या भीतीने तेथून पळून गेलो. शेवटी सर्वात लहान राजकुमाराला राजाने विचारले- तू जेवण केलेस का?


> लहान राजकुमाराने उत्तर दिले- महाराज मी जेवण केले. स्वयंपाक खुप छान झाला होता. हे उत्तर ऐकून राजा म्हणाला, अशा परिस्थितीमध्ये तू जेवण कसे काय केलेस? शिकारी कुत्र्यांनी तुला जेवण कसे करू दिले?


> राजकुमार म्हणाला- महाराज सर्व राजकुमार जेवणाच्या ताटावरून उठले होते. यामुळे माझ्याकडे जेवणाचे 99 ताट शिल्लक होते. शिकारी कुत्रा माझ्याजवळ येताच मी एक-एक ताट कुत्र्याला देत होतो आणि स्वतःही जेवण करत होतो. काही कुत्र्यांनी मला चावण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्यांना तलवारीने मारून टाकले.


> हे ऐकून दरबारातील सर्व लोक राजकुमाराची प्रशंसा करू लागले. राजानेही लहान राजकुमाराला राजा घोषित केले कारण एक राजा धाडसी तसेच बुद्धिमान असणे आवश्यक आहे. हे गुण त्या राजकुमारमध्ये होते.


कथेची शिकवण
या कथेची शिकवण अशी आहे की, कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी व्यक्तीकडे धाडस तसेच हुशारी असणे आवश्यक आहे. हे दोन्ही गुण असल्यास व्यक्ती सहजपणे कोणतेही कार्य पूर्ण करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...