Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | motivational story about elephant and king, inspirational story, prerak katha, king and elephant

एका राजाचा हत्ती खूप शांत होता, तो आपल्या माहूताच्या सुचना चांगल्याप्रकारे समजत असे, पण अचानक त्याचा तो आक्रमक झाला आणि त्याने माहूताला चिरडले, त्यानंतर राजाने एका वैद्याला बोलावले...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 24, 2019, 05:43 PM IST

वाईट संगतीचा परिणान घातक असतो, म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा

 • motivational story about elephant and king, inspirational story, prerak katha, king and elephant


  रिलीजन डेस्क- एका प्राचीन कथेनुसार एका राजाकडे एक हत्ती होता, तो खूप शांत होता. त्याला माहूतांच्या सर्व सुचना आणि त्याच्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजत असत. राजाला आपला हत्ती अतिशय प्रिय होता, म्हणून त्याची खूप काळजी घेतली जात होती. पण ज्या ठिकाणी हत्तीला ठेवले होते, तेथेच चोरांनी आपला ठिय्या मांडला होता. चोर रात्री तेथे यायचे आणि आपल्या चोरीचे कारनामे सांगायचे, भविष्यात चोरी करण्यासाठी योजना तयार करायचे आणि एकमेकांची प्रशंसा करायचे. हत्ती नेहमी या चोरांचे बोलणे ऐकत असे.


  हळू हळू हत्तीला वाटू लागले की, हे लोक चांगले काम करत आहेत. हत्तीवर चोरांच्या बोलण्याचा एवढा परिणाम झाला की, हत्तीसुद्धा आक्रमक झाला. एक दिवस त्याने आपल्या माहूताला पायाने चिरडून मारून टाकले. जेव्हा राजाला ही बाब कळाली त्याने दुसऱ्या माहूताला हत्तीच्या देखरेखीसाठी नियुक्त केले. काही दिवसांतच हत्तीने दुसऱ्या माहूतालाही चिरडले. एका शांत हत्तीमध्ये झालेल्या या बदलामुळे राजा हैराण झाला. राजा आणि त्याच्या मंत्र्यांना समजत नव्हते की, हत्ती अचानक एवढा आक्रमक कसा काय झाला. म्हणून राजाने एका वैद्याला बोलावले.


  वैद्याने हत्तीला पाहिले आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली, तर त्याला समजले की ज्या ठिकाणी हत्तीला ठेवले जाते, तेथेच चोरांचा अड्डा आहे. वैद्याने राजाला सांगुन तेथे असलेल्या चोरांना पकडूण दिले आणि त्या ठिकाणी साधू-संताच्या राहण्याची व्यवस्था केली.
  यानंतर हत्ती रोज साधू संताच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकू लागला. हळू हळू त्याचा आक्रमक स्वभाव शांत होऊ लागला आणि हत्ती आता पहिल्यासारखा झाला होता. राजाने वैद्याला सन्मानित केले.

  कथेची शिकवन
  आपल्यावर हळू हळू का होईना आपल्या संगतीचा परिणाम होत असतो. जर आपण वाईट लोकांसोबत राहीलो तर आपली मानसिक स्तिथी तशीच होईल. यासाठी संतांच्या संगतीचा सल्ला दिला जातो. रोज काही वेळ प्रवचन ऐकले पाहिजे, म्हणजे वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होऊ नये.

Trending