आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी गोष्ट : एक शेतकरी दररोज शेतात सापासाठी दूध ठेवायचा, सकाळी त्याला भांड्याखाली सोन्याचे नाणे मिळायचे; एक दिवस त्याच्या मुलाने सापासाठी दूध ठेवले, त्यानंतर झाले असे... 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेरणादायी गोष्ट- एका गावात एक शेतकरी राहत होता. तो दरवर्षी मेहनत करुन शेतात पिक घ्यायचा. परंतू दरवर्षी त्याच्या शेतातील पिक नष्ट होत असायचे. त्याने सगळे उपाय करुन पाहिले परंतू त्याला यश मिळत नव्हते. मग त्याने शेतातील नागदेवतेची पुजा करण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी तो शेतात गेला. तिथे त्याने नागदेवतेची पुजा करुन नागाला दररोज दूध पाजण्याचा संकल्प केला.

 

संकल्प केल्याप्रमाणे तो दररोज संध्याकाळी दुधाचा एक पेला नागाच्या वारुळाजवळ ठेवून यायचा. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जेव्हा तो दुधाचा पेला परत आणण्यासाठी गेला. तेव्हा पेल्याच्या खाली त्याला एक सोन्याचे नाणे सापडले. हा चमत्कार पाहून तो खूप खुश झाला. त्यानंतर तो दररोज दुधाचा पेला आणायला जायचा तेव्हा त्याला एक सोन्याचे नाणे मिळू लागले.

अनेक दिवस हा प्रकार सुरू होता. परंतू एके दिवशी शेतकऱ्याला कामानिमीत्त तालुक्याच्या गावी जायचे होते. त्यामुळे त्याने त्याच्या मुलाला शेतात पाठवले. ठरल्याप्रमाणे त्याचा मुलगा नागाला दुध पाजण्यासाठी गेला. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की, हा साप दररोज एकच सोन्याचे नाणे देतो. परंतू नागाला जर मारले तर एकाच दिवशी अनेक सोन्याचे नाणे मिळतील. त्यानंतर मुलाने एका काठीने नागाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचा प्रयत्न विफल ठरला. आणि नागानेच मुलाला डसले. असह्य वेदना झाल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला.  

 

गोष्टीचा बोध
मनुष्याने कोणत्याही गोष्टीचा हव्यास करु नये. ज्याप्रकारे गोष्टीतील शेतकऱ्याच्या मुलाच्या हव्यासापोटी मृत्यू झाला. त्याचप्रमाणे मनुष्यावरही ही वेळ येऊ शकते.

 

बातम्या आणखी आहेत...