आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताटातील अन्न पूर्णपणे संपवल्यामुळे मित्र उडवत होते खिल्ली; विद्यार्थ्याने सांगितले यामागील तीन मुख्य कारण, ऐकून शरमेने खाली झुकली मित्रांची मान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेरणादायी गोष्ट- एका गुरुकुलमध्ये एक विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत जेवन करत होता. त्यावेळी त्याच्या सर्व मित्रांनी ताटभरुन जेवन वाढून घेतले. परंतू तो विद्यार्थी जेवन करताना आपल्या ताटात काहीच उष्टे ठेवत नव्हता. तो अगदी प्रमाणात ताटात अन्न वाढून घ्यायचा. ते पाहून त्याचे मित्र त्याची खिल्ली उडवत होते. त्याच्या मित्रांपैकी एका मित्राने त्याला विचारले की, तु रोज ताटातील अन्न का वाया जाऊ देत नाही देत? 

 

मित्राच्या प्रश्नाचे उत्तर देताना विद्यार्थी म्हणाला, मी असे करण्यामागे तीन मुख्य कारणे आहे. सर्वात पहिले कारण म्हणजे मी माझ्या वडिलांचा आदर करतो. आम्हाला अन्न मिळण्यासाठी ते दिवर-रात्र कष्ट करतात. त्यामुळे त्यांच्या कष्टातून मिळालेल अन्न मी फेकू नाही शकत.

 

> दुसरे कारण म्हणजे, मी माझ्या आईचाही आदर करतो. ती रोज सकाळी माझ्यासाठी डब्बा तयार करते. त्यामुळे मी जर हे अन्न वाया घातले तर तिचा अपमान होईल.

 

> तिसरे कारण म्हणजे, मी शेतकऱ्यांचा आदर करतो. शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेऊन शेतीत पिक उगवतात. जर मी अन्न फेकून दिले तर तो त्यांचा अपमान असेल. विद्यार्थ्याचे हे उत्तर ऐकून त्याच्या मित्रांना स्वत:चीच लाज वाटू लागली. त्यानंतर त्यांना याची माफी मागून तेही पुढे ही चूक करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

 

या गोष्टीची शिकवण
या छोट्याशा प्रसंगावरुन आपण एक गोष्ट शिकू शकतो की, आपण कधीच ताटात अन्न वाया जाऊ देऊ नये. त्याशिवाय अन्न ग्रहण करताना आपण आपल्या ताटात प्रमाणापेक्षा जास्त अन्न घेऊ नये जेणेकरुन अन्न वाया जाणार नाही.

 

बातम्या आणखी आहेत...