आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी सुखी आणि संपन्न राहण्याची इच्छा असल्यास या 6 वाईट सवयींपासून दूर राहा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरुड पुराणातील आचार कांडमध्ये अशा काही वाईट सवयींविषयी सांगण्यात आले आहे, ज्यामुळे एखादा राजसुद्धा रंक (भिकारी) होऊ शकतो. या वाईट सवयी सोडल्या नाही तर आयुष्यात कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही. येथे जाणून घ्या, या वाईट सवयी कोणकोणत्या आहेत...


1. नशा
नशा केल्यानंतर व्यक्तीला चांगल्या-वाईट गोष्टींची समज राहत नाही. असा व्यक्ती स्वतःच्या कुटुंब आणि मित्रांना दुःख देतो. नशेमध्ये व्यक्ती चुकीचे काम करण्यासाठी प्रेरित होतो. यामुळे यापासून दूर राहावे.


2. मोह
अत्याधिक मोह करणेही बरबादीचे कारण ठरू शकते. एखाद्या व्यक्तीचा जास्त लळा लागल्यास व्यक्ती चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही आणि त्या व्यक्तीच्या प्रत्येक चुकीच्या कामात मदत करत जातो. यामुळे आयुष्य बरबाद होऊ शकते.


3. लोभ
लोभी (लालची) व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी कुणालाही धोका देऊ शकतो. लोभामुळे व्यक्ती योग्य-अयोग्य गोष्टींचा निर्णय घेऊ शकत नाही आणि बरबाद होतो.


4. क्रोध
रागामध्ये व्यक्तीला चांगल्या-वाईट गोष्टीची पारख होत नाही. रागामध्ये व्यक्ती विचार न करता चुकीचा निर्णय घेतो. यामुळे ही सवय लगेच सोडून द्यावी.


5. अत्याधिक प्रेम
कोणत्याही गोष्टींमध्ये अति करणे वाईट आहे. कोणावरही गरजेपेक्षा जास्त प्रेम करणे चुकीचे ठरते. खूप जास्त प्रेमामुळे व्यक्ती चुकीचे निर्णय घेतो. यामुळे कोणावरही गरजेपेक्षा जास्त प्रेम करू नये. 


6. अहंकार
ग्रंथामध्ये अशा अनेक पात्रांचा उल्लेख करण्यात आला आहे, जे अहंकारामुळे नष्ट झाले. उदा. रावण आणि दुर्योधन. कधीही आपल्या शक्ती आणि धनाचा अहंकार करू नये. अहंकारमध्ये व्यक्ती असे काही बोलून जातो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो.
 

बातम्या आणखी आहेत...