Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | motivational story about king and beggar

राजाला मिळाले नाही पुत्रसुख, गुरूंनी दिला योग्य सल्ला; भिकाऱ्याला केले आपला उत्तराधिकारी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 19, 2019, 12:00 AM IST

दुसऱ्याचे दुःख समजणारा खरा राजा असतो, अशा व्यक्तींना सर्व ठिकाणी सन्मान प्राप्त होतो

 • motivational story about king and beggar


  रिलिजन डेस्क - एका पौराणिक कथेनुसार एक राजा वृद्ध झाला होता. पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. त्याच्या मृत्यूनंतर आपले राज्य आणि प्रजेचे काय होईल याची राजाला चिंता सतावत होती.


  राजाने ही गोष्ट आपल्या गुरूंना सांगितली, त्यावर गुरू म्हणाले की, राजन तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला तुमचा पुत्र म्हणून दत्तक घ्या. गुरूची ही गोष्ट राजाच्या लक्षात आली आणि त्याने योग्य व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी राजाची चिंता आणखी वाढली कारण त्यांना योग्य व्यक्ती शोधूनही सापडत नव्हता.


  राज्याचा उत्तराधिकारी असा व्यक्ती असावा जो दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतःच्या सुखाचाही त्याग करेल. एक दिवस राजा आपल्या महालाच्या खिडकीमध्ये उभा होता, बाहेर एक भिकारी बसला होता. त्याच्या समोर काही भाकऱ्या ठेवल्या होत्या. तो खाणारच होता पण तितक्यात तेथे एक म्हातारा आला आणि त्याने भिकाऱ्याकडे भाकरी मागणी केली. भिकाऱ्याने आपल्याकडील सर्व भाकरी त्या म्हाताऱ्याला देऊ केल्या.


  हे दृष्य पाहिल्यानंतर राजाने भिकाऱ्याला आपल्या महालात बोलावले आणि त्याला मोठ्या आसनावर बसण्यास सांगितले. पण तो भिकारी खाली बसला. राजा त्याला म्हणाला - 'मी तुझी माझा उत्तराधिकारी म्हणून निवड करू इच्छितो आणि पूर्ण राज्य तुला सोपवू इच्छितो.' त्यावर भिकारी राजाला म्हणाला, 'मी तुमचे राज्य घेऊ शकत नाही, मी राज-पाठ घेऊन काय करणार? त्याग हाच खरा धर्म आहे. त्यागच तर मोक्षाचा मार्ग आहे.' यावर राजा त्याला म्हणाला, 'माझ्या राज्यासाठी तूच योग्य उत्तराधिकारी आहेस, तू दुसऱ्याचे दुःख आपले समजतोस आणि त्यासाठी आपल्या सुखाचा त्याग करू शकतो. हाच राजाचा सर्वात मोठा गुण आहे आणि राजाने त्या भिकाऱ्याकडे आपले राज्य सोपवले.

  कथेची शिकवण
  जो व्यक्ती आपल्या सुखापेक्षा इतरांच्या सुखाला महत्व देतो, तोच सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे. अशा व्यक्तींना प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळत असतो.

Trending