आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीचे काम करणाऱ्यांना कधीच सन्मान मिळत नाही, चांगल्या आचरणामुळे सन्मान वाढतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळी राजा-महाराजांना आपल्या महामंत्रीच्या ज्ञान आणि योग्यतेवर पूर्ण विश्वास होता. यामुळे राजा महामंत्रीची प्रत्येक गोष्ट मान्य करत होते. प्रजेतही महामंत्रीचे विशेष स्थान होते. एके दिवशी महामंत्रीच्या मनात एक विचार आला की, राजा आणि इतर लोक माझा एवढा सन्मान का करतात, याचे कारण काय आहे? आपल्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मंत्र्याने एक योजना आखली.


महामंत्री राजकोषातील सुवर्णमुद्रा उचलू लागले
# दुसऱ्या दिवशी महामंत्र्याने दरबारातून परत जाताना राजकोषातून एक सुवर्णमुद्रा गुपचूप उचलली आणि कोषागारच्या अधिकाऱ्यानेही तो प्रकार पाहून न पाहिल्यासारखे केले.


# महामंत्रीने दुसऱ्या दिवशी तसेच केले आणि दोन सुवर्णमुद्रा गुपचूप घेतल्या. कोषागारच्या अधिकाऱ्याने हे पाहून विचार केला की, काही खास कारणामुळे महामंत्री असे करत असतील आणि नंतर अवश्य सांगतील.


# तिसऱ्या दिवशी महामंत्रीने मूठभर सुवर्णमुद्रा घेतल्या. यावेळी कोषागार अधिकाऱ्याने त्यांना पकडून सैनिकांच्या ताब्यात दिले. हे प्रकरण राजापर्यंत पोहोचले.


# न्यायाधीश खुर्चीवर बसलेल्या राजाने आपला निर्णय सुनावताना सांगितले की, महामंत्रीने तीनवेळेस राजकोषातील धन चोरी केले. या गुन्ह्यासाठी महामंत्रीला तीन महिन्यांचा कारावास सुनावण्यात येत आहे.


# राजाच्या निर्णयाने महामंत्रीला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. महामंत्र्याने राजाला निवेदन केले,' राजन मी चोर नाही. मला हे जाणून घ्यायचे होते की, तुम्ही मला जो सन्मान देता त्याचा योग्य अधिकारी कोण आहे. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. माझी योग्यता, ज्ञान आणि सदाचरण हे सन्मानाचे अधिकारी आहेत. आज सर्व लोकांना समजले की, सदाचरण म्हणजे चांगले आचरण सोडताच मी दंडाचा अधिकारी बनलो. सदाचरण आणि नैतिकता हेच माझ्या सन्मानाचे मूळ कारण आहे'


कथेची शिकवण
ज्या लोकांचे आचरण योग्य असेल त्यांनाच समाजात सन्मान मिळतो. आचरण योग्य नसल्यास व्यक्ती शिक्षेस पात्र ठरतो.