Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | motivational story about lion and fox

परमेश्वराने दिलेल्या शक्ती आणि बुद्धीचा उपयोग करून आपण आपले कल्याण करू शकतो

रिलिजन डेस्क | Update - Apr 23, 2019, 08:06 AM IST

शेतकऱ्याने जंगलात पहिले एक विचित्र दृश्य, सिंहाने दोन पायाच्या कोल्ह्यासाठी आपल्या शिकारीतील काही भाग काढून ठेवला, शेतकऱ

 • motivational story about lion and fox

  पौराणिक कथेनूसार एक शेतकरी जंगलात लाकडं आणायला गेला. जंगलात लाकुड तोडताना त्याला एक कोल्हा दिसला, त्याला दोन पाय नव्हते तरीही तो कोल्हा टुनटूनीत दिसत होता. शेतकऱ्याला आश्चर्य वाटले की, हा कोल्हा जिवंत आणि स्वस्थ कसा आहे. काही वेळाने शेतकऱ्याला सिंहाची डरकाळी ऐकू आली. शेतकरी घाबरला आणि एका झाडामागे जाऊन लपला. तेवढ्यात सिंह तिथे आला सिंहाने आपल्या तोंडात शिकार दाबून आणली होती. तो कोल्ह्याजवळ आला आणि शिकारीमधला थोडा भाग कोल्ह्यासाठी ठेवला.


  शेतकरी झाडामागून हे सर्व पाहात होता, त्याला वाटले देव खुप दयाळू आहे. देवाला फक्त मनूष्याचीच नाहीतर सर्व प्राण्याची काळजी आहे आणि परमेश्वर सर्वांना खायला नक्की देतो. असा विचार करून शेतकरी त्याच जागेवर बसला जिथे कोल्हा बसला होता आणि वाट पाहत होता की कोणीतरी त्याच्यासाठी जेवन घेऊन येईल. तो देवाचे ध्यान करत होता.


  बसून बसून खुप वेळ झाला पण तिथे कोणीच आले नाही. आता भुकेने तो खूप व्याकूळ होत होता. या दरम्यान जंगलातून एक संत जात होते, त्यांनी भुकेने व्याकुळ झालेल्या शेतकऱ्याला पाहीले त्यांनी त्याला खाऊ घातले आणि संपुर्ण गोष्ट विचारली.


  शेतकऱ्याने कोल्हा आणि सिंहाचा संपुर्ण प्रसंग सांगितला. तो संतांना म्हणाला देवाला कोल्ह्यावर दया आली पण माझ्यासाठी तो एवढा निर्दयीपणे कसा वागला, त्यावर संत शेतकऱ्याला म्हणाले तू अज्ञानी आहेस देवाने दिलेला संकेत तूला समजला नाही.


  देव तूला सिंहासारखे बनवत आहे, कोल्ह्यासारखे नाही. तूला मदत घेण्याची गरज नाही उलट तू दुसऱ्यांची मदत करायला पाहिजे. देवाने तूलासुद्धा शक्ती आणि बुद्धी दिली आहे, याचा उपयोग करून आपले कल्याण करू शकतो. पण तू आळशीपणामुळे दुसऱ्याचा आधार घेऊन जगण्याचा विचार करत आहेस.


  कथेची शिकवण
  परमेश्वराने सर्वांना शक्ती आणि बुद्धी दिली आहे. आपल्या शक्ती आणि बुद्धीचा वापर करून मनुष्य खुप काही करू शकतो. परंतू बहूतांश लोक दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. आपण दुसऱ्यांची मदत घेण्याचा विचार नाही केला पाहीजे. आपल्यालाच ठरवायचे आहे की आपण सिंहासारखी दुसऱ्यांची मदत करायची की कोल्ह्यासारखा एखाद्याचा आश्रय घ्यायचा.

Trending