एका मुलीने वृद्ध साधूला विचारले- बहुतांश लोकांना खरे प्रेम मिळत नाही, यामागचे कारण काय? साधू म्हणाले- बागेतून सर्वात सुंदर फुल घेऊन ये, त्यानंतर सांगतो

जे समोर असते त्याची किंमत करत नाहीत लोक, आणखी चांगल्या जोडीदाराच्या शोधात राहतात

रिलिजन डेस्क

Apr 06,2019 12:02:00 AM IST

लोककथेनुसार, एका गावातील मुलीने एक वृद्ध आणि विद्वान साधूला विचारले की, बहुतांश लोकांना खरे प्रेम का मिळत नाही? यामागचे कारण काय?


> साधू म्हणाले, मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल परंतु त्यापूर्वी तू बागेतून सर्वात सुंदर फुल तोडून माझ्याकडे घेऊन ये.


> मुलगी लगेच जवळच्या बागेत गेली आणि सर्वात सुंदर फुल शोधू लागली. तिला एक सुदंर फुल दिसले परंतु तिने विचार केला की यापेक्षाही सुंदर फुल बागेमध्ये असू शकते आणखी काही फुले पाहू.


> मुलगी पुढे निघून गेली परंतु तिला आणखी जास्त सुंदर फुल दिसले नाही. तिने पहिले पाहिलेली फुलंच तोडून नेण्याचा विचार केला.


> मुलगी पुन्हा ते फुल असलेल्या ठिकाणी गेली परंतु ते फुल कोणीतरी तोडून घेऊन गेले होते. मुलगी रिकाम्या हाताने साधूकडे आली.


> तिने साधूला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा साधू म्हणाले याच कारणामुळे लोकांना खरे प्रेम मिळत नाही. जे समोर असते लोक त्याला भाव देत नाहीत आणि पुढे निघून जातात. जेव्हा त्यापेक्षा चांगला जोडीदार मिळत नाही तेव्हा पुन्हा परत येतात परंतु त्यावेळी आपल्याला तो मिळत नाही कारण त्याला दुसरे कोणीतरी भेटलेले असते. यामुळे बहुतांश लोकांना खरे प्रेम मिळत नाही.

X
COMMENT