आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, या जगात आईलाच सर्वात जास्त महत्त्व का दिले जाते?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा स्वामी विवेकानंद यांना एका व्यक्तीने विचारले- स्वामीजी या जगात सर्वात जास्त महत्त्व आईलाच का दिले जाते?


> स्वामीजी हसून त्या व्यक्तीला म्हणाले- सर्वात आधी तू समोर पडलेला दगड कपड्यात गुंडाळून कंबरेला बांधून घे. त्यानंतर उद्या मला येऊन भेट मग मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.


> त्या व्यक्तीने स्वामीजींच्या आज्ञेचे पालन केले आणि कंबरेवर दगड बांधून घेतला. थोड्यावेळाने तो व्यक्ती पुन्हा स्वामीजींकडे आला आणि म्हणाला गुरुजी तुम्ही मला एक प्रश्न विचारल्यामुळे एवढी मोठी शिक्षा का दिली?


> स्वामीजी म्हणाले- तू या दगडाचे ओझे काही काळही घेऊ शकला नाही. याउलट एक आई आपल्या मुलाला पूर्ण नऊ महिने गर्भात ठेवते. घरातील संपूर्ण काम करते, कधीही काम अपूर्ण ठेवत नाही. थकवा आला तरी हसून सर्वांना सामोरे जाते. या जगात आईपेक्षा दुसरे कोणीही सहनशील नाही. यामुळे आईला महान मानले जाते.


कथेची शिकवण 
> या छोट्या कथेची शिकवण ही आहे की, आपण आपाल्या आईचा तसेच सर्व महिलांचा मान-सन्मान, आदर करावा. महिलांची सहनशीलता पूजनीय आणि सन्माननीय आहे. कधीही कोणत्याही महिलेचा आणि आईचा अपमान करू नये.

बातम्या आणखी आहेत...