आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक गवळण सर्वांना दूध मोजून देत असायची, परंतू एका तरुणाला कोणतेही मोजमापन न करताच दूध देत होती; हा प्रकार एका साधूंच्या लक्षात आला, त्यांना समजलेच नाही, गवळण असे का करत असेल ?... 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेरणादायी गोष्ट- एका गावात एक गवळण दूध विकण्याचा व्यवसाय करत होती. ती सर्व लोकांना एकसारख्या मापाने दूध देत असायची. परंतू एका तरुणाला ती न मापताच दूध द्यायची. एके दिवशी त्या गावात एक महान साधू आले. त्यांनी त्या गवळणीच्या घरासमोर आपली कुटी तयार केली. 

 

दुसऱ्या दिवशी सकाळी ती गवळण दूध विकण्याचे काम करत होती. नेहमीप्रमाणे तिने त्या तरुणाला दूध न मापताच दिले. ही गोष्ट त्या साधूंच्या लक्षात आली. ती गवळण असे का करते याचा त्यांना प्रश्न पडला.

 

साधूंनी गावातील लोकांना ही गोष्ट विचारली. साधूंच्या प्रश्नावर उत्तर देताना लोकांनी त्यांना सांगितले की, ती गवळण त्या तरुणावर प्रेम करते. त्यामुळेच ती त्याला न मापताच दूध देते. ती गवळण त्या तरुणाशी पैशाचा हिशोब कधीच ठेवत नाही.

 

साधूंना ही गोष्ट कळाली तेव्हा ते म्हणाले की, 'गवळण ज्या व्यक्तीवर प्रेम करते ती त्या तरुणाशी कोणताच देवाण-घेवाणीचा व्यव्हार ठेवत नाही. त्याचप्रमाणे मी देवावर प्रेम करतो तर मी त्यांची भक्ती करताना जाप करण्याची संख्या का ठेवतो? इथून पुढे मीदेखील देवाची सेवा करताना कोणताच हिशोब ठेवणार नाही.' 

 

गोष्टीचा बोध
या गोष्टीचा असा बोध होतो की, जेव्हा आपण लोकांवर प्रेम करतो तेव्हा त्यांच्याशी कोणताच व्यव्हार ठेवत नाही. त्याचप्रमाणे आपण देवाची भक्ती करताना त्याच्या कृपेची कोणतीच अपेक्षा ठेवता कामा नये.

 

बातम्या आणखी आहेत...