शत्रू कितीही मोठा असला तरी बुद्धीने करावे काम, मोठ्यातीलमोठी अडचण होऊ शकते दूर 

नदीच्या काठावरील झाडावर एक चिमणी आणि झाडाच्या खाली एक साप राहत होता, साप नेहमी चिमणीने दिलेले अंडे खाऊन टाकायचा, चिमणीने हुशार कावळ्याकडे मदत मागितली, कावळा म्हणाला- राजकुमारी स्नान करण्यासाठी आल्यानंतर मला आवाज दे...

Apr 03,2019 12:01:00 AM IST

लोककथेनुसार, प्राचीन काळी एका नदीच्या काठावरील झाडावर चिमणीचे घरटे होते. त्याच झाडाखाली एक सापही राहत होता. चिमणीने दिलेले अंडे साप नेहमी खाऊन टाकायचा.


> साप असे वारंवार करत होता. चिमणी खूप लहान असल्यामुळे सापाचा सामना करू शकत नव्हती. तिने एक हुशार कावळ्याला सर्व घटना सांगितली. कावळ्याने या सापाचा काहीतरी बंदोबस्त करू असे चिमणीला वचन दिले.


> कावळा चिमणीला म्हणाला, या नदीमध्ये स्नान करण्यासाठी राजकुमारी येते, पुढच्या वेळी राजकुमारी आल्यानंतर तू मला सांग. चिमणीने होकार दिला.


> दुसऱ्या दिवशी राजकुमारी स्नान करण्यासाठी आल्यानंतर चिमीने लगेच कावळ्याला बोलावून घेतले. राजकुमारीने स्नान करण्यापूर्वी आपल्या सोन्याचा हार काढून नदीच्या काठावर ठेवला. कावळ्याने तो हार उचलून सापाच्या बिळामध्ये टाकला आणि उडून गेला. हाताच्या शोधामध्ये सैनिक बिळापर्यंत आले. हार बिळामध्ये गेल्यामुळे साप बाहेर आला आणि त्या सापाला सैनिकांनी मारून टाकले. अशाप्रकारे चिमणीची अडचण दूर झाली.


कथेची शिकवण
शत्रू कितीही मोठा आणि ताकदवान असला तरीही आपण बुद्धीचा वापर करावा. या कथेमध्ये चिमणी आणि कावळा दोघेही सापाचा सामना ताकदीने करू शकत नव्हते. यामध्ये कावळ्याने बुद्धीचा वापर केला आणि साप मेला. बुद्धीचा वापर करूनच आपण मोठमोठ्या अडचणींवर मात करू शकतो.

X