Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | motivational story about snake and owl

दोन घुबड सोबत बसले, एकाच्या तोंडात साप तर दुसऱ्याच्या उंदीर होता; सापाने उंदराला पाहताच तो विसरला की तो स्वतःच मृत्यूच्या दारात आहे आणि त्याने सापाला खाण्याचा प्रयत्न करू लागला, उंदराने सापाला पाहताच तो थरथरत होता

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 08, 2019, 12:05 AM IST

चवीच्या लोभात प्राण्याला सर्व काही विसरतो, मृत्यू पेक्षाही मरणाची भीती जास्त असते

 • motivational story about snake and owl


  रिलिजन डेस्क - एका पौराणिक कथेनुसार पुरातन काळात दोन घुबड सोबत बसले होते. एकाच्या तोंडात साप होता तर दुसऱ्याचा उंदीर. दोघेही आपले भोजन करणारच होते तेवढ्यात सापाची नजर उंदरावर गेली. त्याने उंदराला खाण्यासाठी झटापट केली. पण सापाला याचा विसर पडला की, तो स्वतःच मृत्यूच्या दारात उभा आहे.


  > दुसऱ्या घुबडाच्या तोंडातील उंदराने सापाला बघितले असता तो साप आपल्याला खाऊन टाकेल या भीतीने थरथर कापू लागला.


  > हा सर्व प्रकार पाहून दोन्ही घुबडं हैराण झाले. दोघांनी आपापली शिकार फस्त केली. यानंतर एक घुबडाने दुसऱ्या घुबडाला विचारले की, 'साप आणि उंदराला पाहून तुला काही समजले का?'


  > दुसरे घुबड म्हणाले की, ' या दोघांना पाहून पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की, जीभेची आणि चवीची इच्छा सर्वांत मोठी असते. ह्या इच्छा प्रबळ असल्यास प्राणी समोर उभा असलेला मृत्यू देखील पाहू शकत नाही.'


  > दूसरी गोष्ट अशी की, मृत्यूचे भय हे मृत्यूपेक्षाही मोठे असते. उंदराने जेव्हा सापाला तेव्हा त्याला भीती वाटली की, साप त्याचा जीव घेईल. पण तो आधीपासून मृत्यूच्या दारात होता.

  कथेची शिकवण

  > या गोष्टीपासून एक शिकवण मिळते की, चवीचा मोह व्यक्तीची विचार करण्याची संपवतो, यापासून सावध राहिले पाहिजे. व्यक्ती चवीच्या नादात त्याच्या आरोग्याला अपायकारक असलेली गोष्ट देखील खातो. यामुळे अशा लोभापासून दूर राहायला हवे.
  > दुसरी शिकवण अशी की, व्यक्ती मृत्यूला नाही मरणाच्या भीतीला घाबरतो.

Trending