आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकवण : इतरांना त्यांच्या चुकांसाठी माफ करावे आणि मदत करून विसरून जावे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रचलित लोककथेनुसार, एक व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेसाठी गावामध्ये प्रसिद्ध होता. गावातील लोक त्याच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन जायचे आणि तो त्यावर मार्ग सांगायचा. वृद्धावस्था आल्यानंतर एके दिवशी त्याला त्याचा शेवट जवळ आला असल्याचे लक्षात आले. त्याने आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि सांगितले मला तुला ज्ञानाच्या चार गोष्टी सांगायच्या आहेत. या 4 गोष्टींकडे तू विशेष लक्ष दिल्यास जीवनात नेहमी सुखी राहशील...

इतरांना माफ करणे
वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलाला सांगिलते की, घर-कुटुंबात कोणी काहीही बोलले तरी तू त्यांच्या वाईट बोलण्याकडे लक्ष देऊ नको. कधीही छोट्या-छोट्या गोष्टींसाठी एखाद्याचा बदला घेण्याची भावना मनात ठेवू नको. लोकांना त्यांच्या चुकांसाठी माफ करावे. ही गोष्ट विशेषतः घरात अवश्य लक्षात ठेवावी.

मदत करून विसरून जाणे
जेव्हाही इतरांना मदत कराल ती लक्षात ठेवू नये. मदत करून विसरून जावे. कोणालाही मदत केल्यानंतर त्याच्याकडून काही मिळेल याची अपेक्षा ठेवू नये.

देवावर विश्वास ठेवणे 
कोणत्याही कामामध्ये यश प्राप्तीसाठी अथक परिश्रम करावेत. स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवावा. देव तुमच्यासाठी निश्चितच चांगले करेल.

मोह न ठेवणे 
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू निश्चित आहे. कोणताही व्यक्ती स्वतःसोबत काहीही घेऊन जात नाही. यामुळे कधीही कोणत्याही वस्तू किंवा सुख-सुविधेच्या मोहात राहू नये. नेहमी वैराग्य भाग जागृत ठेवावा. जो व्यक्ती या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवून मार्गक्रमण करतो तो आयुष्यात नेहमी सुखी राहतो.