आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नी दोघेही महत्त्वपूर्ण आहेत, पतीने पत्नीच्या भावना समजून घ्याव्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळी एक नवाब होता. घर-कुटुंबात आणि समाजात नवाबाचा खूप मान-सन्मान होता. एके दिवशी नवाब आपल्या पत्नीला म्हणाला, माझ्यामुळे तुला प्रत्येक ठिकाणी मान-सन्मान मिळतो. पत्नीने उत्तर दिले, मी एका मिनिटात तुमचा सर्व मान-सन्मान धुळीस मिळवू शकते. नवाब म्हणाला ठीक आहे असे करूनच दाखव. थोड्यावेळाने दोघांचाही राग शांत झाला आणि काही दिवस असेच निघून गेले.


> एका संध्याकाळी नवाब आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात घरातून त्यांच्या मुलाचा रडण्याचा आवाज आला. नवाबाने विचारले, बेगम काय झाले मुलाला, कशामुळे त्याला रागवत आहेस?


> पत्नीने आतूनच उत्तर दिले, आत्ताच पोटभर जेवण केले असून हा पुन्हा खिचडी मागत आहे. नवाब म्हणाला, ठीक आहे थोडी खिचडी दे त्याला.


> पत्नी म्हणाली घरामध्ये आणखीही लोक आहे, सगळी खिचडी याला कशी देऊ?


> ही सर्व चर्चा नवाबाचे मित्रही ऐकत होते. त्यांनी विचार केला की, असा कसा नवाब आहे हा, घरात खिचडीसाठी भांडण होत आहे. सर्व मित्र गुपचूप उठून गेले. नवाबाच्या लक्षात आले की, आज पत्नीमुळे त्याला मान खाली घालावी लागली.


> तो आपल्या पत्नीकडे गेला आणि म्हणाला, तू तुझे म्हणणे खरे केले. आता माझा मान-सन्मान मला पुन्हा मिळवून दे. पत्नी म्हणाली ठीक आहे, उद्या तुमच्या मित्रांना पुन्हा बोलावून घ्या.


> दुसऱ्या दिवशी नवाबचे मित्र आले आणि पुन्हा मुलाच्या रडण्याचा आवाजही आला. नवाबाने विचारले बेगम, आज काय झाले? आतून पत्नी म्हणाली, आज पुन्हा खिचडीसाठी रडत आहे.


> नवाब म्हणाला ठीक आहे, त्याला खिचडी दे आणि माझ्या मित्रांसाठीही घेऊन ये.


> पत्नी लगेच एका नोकरासोबत मोठ्या भांड्यात खिचडी घेऊन आली. मित्रांनी पाहिले की, ही सामान्य खिचडी नाही, यामध्ये सुकामेवा, खजूर, पिस्ता, मनुके इ. सामग्री टाकण्यात आली होती. सर्व मित्र म्हणाले नवाब साहेबांचा थाटच वेगळा आहे.


> पत्नीमुळे पुन्हा नवाबाचा मान-सन्मान वाढला.


कथेची शिकवण 
वैवाहिक जीवनात पती-पत्नी दोघेही सामान स्वरूपात महत्त्वपूर्ण आहेत. पतीने आपल्या पत्नीच्या भावनांचा मान-सन्मान करावा. पत्नीच्या सहकार्याशिवाय पतीला घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...