आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही लोक इतरांचे वाईट करण्याचा नादात स्वतःचेही भले करू शकत नाहीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका महिलेला यमदेव भेटले परंतु ती त्यांना ओळखू शकली नाही. तिने यमदेवाला पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर यमदेव महिलेला म्हणाले- मी तुझे प्राण घेण्यासाठी आलो आहे परंतु तू मला पिण्यासाठी पाणी दिल्यामुळे तुझ्यावर मी प्रसन्न आहे. मी तुला तुझे भाग्य बदलण्याची एक संधी देतो. एवढे बोलून यमदेवाने एक पुस्तक महिलेला दिले आणि सांगितले यामध्ये तुझ्या नावाचेही एक पान आहे. त्याठिकाणी तू तुला पाहिजे ते लिहू शकतेस. तू जे काही लिहशील त्याप्रमाणे सर्वकाही घडेल. 


- महिलेने पुस्तक हातामध्ये घेतले आणि पुस्तक उघडताच त्यामध्ये लिहिले होते की, तुझ्या मैत्रिणीला खजिना मिळणार आहे.


- महिलेने तेथे लिहिले की तिला खजिना मिळू नये.


- पुढचे पान उलटल्यानंतर त्यावर लिहिले होते की, तुझ्या शेजारणीचा पती राजाचा मंत्री होणार आहे.


- महिलेने तेथे लिहिले की, तो मंत्री बनू नये.


- काही वेळाने तिला तिच्या नावाचे पान दिसले. ती स्वतःसाठी चांगले-चांगले लिहण्याचा विचार करू लागली परंतु ती लिहिण्याची सुरुवात करणार तेवढ्यात यमदेवाने तिच्याकडून पुस्तक काढून घेतले.


कथेची शिकवण 
या कथेची शिकवण अशी आहे की, अनेक लोक इतरांचे वाईट करण्याचा विचार करतात आणि संधी मिळाल्यानंतर तसे करतातही. या नादामध्ये ते अनेकवेळा स्वतःचे भले करून घेण्याचीही संधी सोडून देतात. आपण इतरांचे भले करू शकलो नाहीत तर कमीत कमी वाईटही करू नये. त्या महिलेने आपल्या मैत्रीण आणि शेजारणीविषयी वाईट विचार केला नसता तर स्वतःचे भाग्य बदलू शकत होती. परंतु पहिले तिने त्यांचे वाईट करण्याचा विचार केला आणि स्वतःचे प्राणही वाचवू शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...