आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहंकारासमोर आपले सर्व गुण प्रभावहीन होतात, यापासून नेहमी दूर राहावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळी एका कुख्यात डाकू आणि प्रसिद्ध साधूचा एकाच दिवशी मृत्यू झाला. दोघांवरही एकाच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्या दोघांचाही आत्मा यमलोकात पोहोचला. यमदेवाने दोघांच्याही कर्माची पाहणी केली आणि दोघांनाही त्यांच्या कर्माविषयी काही बोलायचे असल्यास बोलावे असे सांगितले.

> डाकू विनम्रपणे म्हणाला, प्रभू मी एक डाकू होतो आणि आयुष्यभर पाप केले आहेत. तुम्ही मला माझ्या कर्माचे जे काही फळ द्याल ते मला मान्य आहे.


> साधू म्हणाले, महाराज मी आजीवन तप केले आहे. देवाची भक्ती केली आहे. आयुष्यात मी कधीही कोणतेच चुकीचे काम केलेले नाही. नेहमी धर्म-कर्माचे पालन केले आहे. यामुळे मला स्वर्गात स्थान मिळावे.


> यमदेवाने दोघांचेही बोलणे ऐकून घेतले आणि डाकूला साधूची सेवा करण्यास सांगून हीच तुझी शिक्षा आहे असे सांगितले. डाकू या कामासाठी तयार झाला परंतु हे ऐकताच साधूला राग आला.


- साधू, यमदेवाला म्हणाले महाराज हा तर पापी तसेच याचा आत्माही अपवित्र आहे. याने जीवनात कधीच कोणतेही काम चांगले केले नाही. याने मला स्पर्श केल्यास माझा धर्म नष्ट होईल.


- साधूचे बोलणे ऐकून यमदेव क्रोधीत झाले. ते म्हणाले, ज्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांच्या हत्या केल्या, लोकांवर राज्य केले त्याचा आत्मा विनम्र झाला आणि तुझी सेवा करण्यासाठीसुद्धा तयार झाला. याउलट तू आयुष्यभर भक्ती आणि तपश्चर्या करूनही तुझ्या स्वभावात अहंकार आहे. मृत्यूनंतरसुद्धा तू विन्रम नाही झाला. यामुळे तुझी तपश्चर्या अपूर्ण आहे. आता तू या डाकूची सेवा करणार हीच तुझी शिक्षा आहे.


कथेची शिकवण
> आपण नेहमी चांगले काम करावे, परंतु कधीही चांगल्या कामाचा गर्व करू नये. जे लोक अहंकारात जगतात त्यांच्या सर्व इच्छाही नष्ट होतात. व्यक्तीने नेहमी विनम्र राहावे. त्यामुळेच त्याला सुख प्राप्त होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...