आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाचा कर्मस्वरूपात वापर झाला तरच जीवनात बदल घडण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

 एकदा भगवान बुद्ध भ्रमंती करताना नदीच्या किनारी वास्तव्यास होते. ते आयुष्यातील विविध पैलूंवर दररोज व्याख्यान देत होते. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी दूरदूरचे गावकरी येत असत. बुद्धांच्या प्रवचनात एक प्रकारचा प्रवाह आणि तत्त्वज्ञान होते. त्यांच्या प्रवचनात जीवनाचे सार लपलेले होते. त्यांची वाणी ऐकून श्रोते मंत्रमुग्ध होत असत. हे प्रवचन ऐकायला जवळच्याच गावातील एक माणूस येत असे. कुणीतरी म्हटले की, बुद्धांचे प्रवचन ऐकून जीवनात खूप मोठे परिवर्तन येते. अनेक समस्यांने निराकरण होते. त्यामुळे तो तेथे दररोज येऊ लागला.  अनेक महिने झाले तरी त्याच्या जीवनात काहीच बदल झाला नाही. त्यामुळे एक दिवस प्रवचनानंतर सगळे लोक गेल्यानंतर तो माणूस बुद्धांकडे गेला. म्हणाला, मी एक चांगला माणूूस बनण्यासाठी तुमच्याकडे येतो. दररोज तुमची प्रवचने ऐकतो. ती ऐकून माझ्यात खूप उत्साह संचारतो. पण माझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला दिसत नाही.' त्याचे बोलणे ऐकून बुद्ध हसले. त्यांनी त्या माणसाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, 'वत्स, तू कोणत्या गावातून आला आहेस?' त्या माणसाने गावाचे नाव सांगितले. बुद्धाने विचारले, ते किती दूर आहे. त्या माणसाने १२ किलोमीटर असे उत्तर दिले. बुद्धांनी पुन्हा विचारले की, गावातून इथपर्यंत कसे येता? त्यावर माणूस म्हणाला, मी पायीच येतो. पण तुम्ही एवढे प्रश्न का विचारत आहात? बुद्ध म्हणाले, 'इथे बसल्या-बसल्याच तुम्ही गावी पोहोचाल का?' तो माणूस म्हणाला, हे अशक्य आहे. मला चालत जावेच लागेल, तेव्हाच तर मी गावापर्यंत पोहोचेन ना.  बुद्ध म्हणाले, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. तुला गावाचा रस्ता माहिती आहे. तो ओळखीचाही आहे. पण ही माहिती व्यवहारात वापरल्याविना, प्रयत्न केल्याशिवाय, पायी चालल्याशिवाय तू तेथे पोहोचूच शकणार नाही. त्याच प्रकारे तुझ्याकडे जे ज्ञान आहे ते आयुष्यात अमलात आणले नाही तर एक चांगला माणूस बनू शकणार नाही.

शिकवण : गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाचा वापर व्यवहारात आणि आयुष्यात वापर झाला तेव्हाच खरे परिवर्तन घडते. केवळ ज्ञान मिळवून जीवनात बदल होत नाहीत. या ज्ञानाचा वापर कर्म स्वरूपात झाला पाहिजे. 

बातम्या आणखी आहेत...