बोधकथा / निसर्ग सर्वांना समान संधी देताे, भाग्य कसे घडवायचे हे आपल्यावरच अवलंबून असते...

निसर्ग काेणाशीही भेदभाव करीत नाही आणि सर्वांना समान संधी देताे

रिलिजन डेस्क

Feb 11,2020 12:05:00 AM IST

प्राचीन कथेनुसार एका गुरूंच्या आश्रमात अनेक विद्यार्थी अध्ययन करीत हाेते. दरराेज सकाळचा वर्ग आटाेपल्यानंतर प्रश्नाेत्तरांचे सत्र सुरू हाेत असे. त्या वेळी शिष्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन गुरू समाधान करीत असत. त्यासाठी गुरू प्रयाेगांचा वापर अधिक प्रमाणात करीत. एके दिवशी एका शिष्याने त्यांना विचारले, ‘गुरुजी, तुम्ही सर्वांना सारख्याच बाबी शिकवता, परंतु येथून गेल्यानंतर सगळेच जण सारखी कामे करीत नाहीत. जरीही त्यांनी एकसारखे काम सुरू केले तरी त्यातील निष्पत्ती ही विभिन्न स्वरूपाची दिसून येते.’


हे एेकल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना एक बटाटा, एक अंडे आणि गुळाची एक ढेप आणण्यास सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले, ‘बटाटा कसा आहे?’ सर्वांनी म्हटले, ‘कडक.’ त्यानंतर त्यांनी अंड्याविषयी विचारले. सर्वजण म्हणाले, बाह्य आवरण जरी टणक असले तरी आत अतिशय नाजूक आहे. गुळाची ढेप ना फारशी कठीण आहे, ना बरीच नरम. गुरुजींनी हे अंडे, बटाटा आणि गूळ सारख्याच प्रमाणात पाणी भरलेल्या तीन वेगळ्या भांड्यात टाकून चुलीवर ठेवण्यास सांगितले. बराच वेळ पाणी उकळल्यानंतर गुरुजींनी शिष्यांना तिन्ही पातेले आणण्यास सांगितले.


गुरुजींनी बटाटा बाहेर काढला आणि शिष्यांना सांगितले, तिन्ही भांड्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन पाहा. आता बटाटा कसा दिसताे? सारे म्हणाले, पूर्वीच्या तुलनेत ताे मऊ झाला आहे. त्यानंतर त्यांनी अंडे काढले, सर्वजण म्हणाले, पूर्वीपेक्षा कडक बनले आहे. गूळ पाण्यात विरघळला हाेता, त्यामुळे सारे पाणी गाेड झाले हाेते.आता गुरुजी म्हणाले, तीन निरनिराळ्या बाबींना सारख्याच वातावरणात, परिस्थितीत ठेवले, मात्र तिघांची स्थिती एकसारखी राहिली नव्हती. बटाटा मऊ झाला, अंडे अधिक कडक बनले आणि गुळाने तर रूपच बदलले. नेमका हाच संदर्भ मनुष्यांना लागू हाेताे. सर्वांना समान संधी मिळतात, अडचणी येतात, परंतु हे पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून आहे की आपण त्या अडचणींना मुकाबला कसा करताे आणि त्यानंतर आपण काय भूमिका घेताे यावरच तर भाग्य ठरते.


शिकवण : निसर्ग काेणाशीही भेदभाव करीत नाही आणि सर्वांना समान संधी देताे, परंतु त्या संधीचा उपयाेग कसा करायचा आणि भाग्य कसे घडवायचे ते आपल्या हाती असते.

X