आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाईट काळातही आपण सकारात्मक राहिलो तरच राहू शकतो सुखी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका गावाबाहेर दोन साधू झोपडी बांधून राहत होते. दोन्ही साधू रोज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भिक्षा मागत होते आणि संध्याकाळी झोपडीत परत येत होते. दिवसभर देवाचे नामस्मरण करायायचे. अशाप्रकारे दोघेही जीवन व्यतीत करत होते. एके दिवशी दोघेही वेगवेगळ्या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले. संध्याकाळी परत आल्यानंतर त्यांना गावात वादळ येऊन गेल्याचे समजले.


> पहिला साधू झोपडीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याला झोपडी वादळाने उद्धवस्त झालेली दिसली. हे पाहून तो क्रोधीत झाला आणि देवाला वाईट बोलू लागला. तो म्हणाला मी दररोज तुझी सेवा, नामस्मरण करतो, मंदिरात पूजा करतो, गावामध्ये चोर आणि वाईट लोकांचे घर व्यवस्थित आहेत आणि आमचीच झोपडी मोडली आहेस. आम्ही दिवसभर तुझी पूजा करतो परंतु तुला आमची चिंता नाही.


> दुसरा साधू झोपडीजवळ पोहोचल्यानंतर त्यालाही झोपडी वादळाने अर्धी मोडलेली दिसली. हे पाहून याला आनंद झाला. देवाचे आभार मानू लागला. साधू म्हणाला हे देवा आज माझा विश्वास बसला आहे की, तू आमच्यावर प्रेम करतोस. आमची भक्ती आणि पूजा व्यर्थ गेली नाही. एवढ्या वादळातही आमची अर्धी झोपडी तू वाचवलीस. आता आम्ही सुखाने या झोपडीत आराम करू शकतो. आजपासून देवावरचा माझा विश्वास वाढला आहे.


कथेची शिकवण 
दोन एकसारख्या लोकांच्या जीवनात एकच घटना घडली परंतु दोघांचीही विचार करण्याची पद्धत वेगळी होती. एकाचे विचार सकारत्मक तर दुसाऱ्याचे नकारात्मक होते. वाईट काळात आपले विचारच आपल्याला सुख किंवा दुःख प्रदान करतात. आपण वाईट विचार केल्यास नेहमी दुःखीच राहतो. यामुळे प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करावा. दुसऱ्या साधूने वाईट काळातही चांगला विचार केला आणि यामुळे तो खुश होता.

बातम्या आणखी आहेत...